Friday, May 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

१ लाख कोटी खर्चच झाले नाहीत, कृषी मंत्रालयाकडून निधीची ‘घरवापसी’; काय आहे अहवाल? निधी का परत केला?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 16, 2024
in india
0
१ लाख कोटी खर्चच झाले नाहीत, कृषी मंत्रालयाकडून निधीची ‘घरवापसी’; काय आहे अहवाल? निधी का परत केला?
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 काही वर्षांत शेतीवरील खर्चापोटी केंद्राने दिलेल्या रकमेपैकी एक लाख कोटी रुपयांच्या निधीची ‘घरवापसी’ झाली आहे. खर्च न झाल्याने हा पैसा देशाच्या तिजोरीत परत आल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. कृषी क्षेत्राचा हा अहवाल नेमका काय आहे, पैसे का परत गेले?

 

 

देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मानल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने मागील काही वर्षांत भरघोस वाढ केली. पैसे नाहीत म्हणून वारंवार ओरड झाल्यानंतर केंद्राने पुढाकार घेत हात मोकळे सोडले खरे; परंतु प्रत्यक्षात दिलेले पैसे खर्चच होत नसल्याचा विरोधाभास पुढे आला आहे. काही वर्षांत शेतीवरील खर्चापोटी केंद्राने दिलेल्या रकमेपैकी एक लाख कोटी रुपयांच्या निधीची ‘घरवापसी’ झाली आहे. खर्च न झाल्याने हा पैसा देशाच्या तिजोरीत परत आल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. कृषी क्षेत्राचा हा अहवाल नेमका काय आहे, पैसे का परत गेले?

 

 

शेतीसाठी देशभरातील विविध राज्यांना दिलेल्या एकूण रकमेपैकी एक लाख कोटी रुपयांचा निधी मागील पाच वर्षांत खर्च झाला नसल्याची बाब कृषी मंत्रालयाच्याच अहवालाने अधोरेखित केली. मार्च २०२२ ते एप्रिल २०२३ या वर्षात शेतीसाठी सव्वा लाख कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला. त्यापैकी तब्बल २१ हजार कोटी रुपये शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या विभागाने केंद्राकडे परत पाठविले. सन २०२१-२२ मध्ये परत गेलेल्या पाच हजार १५२ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२३ मधील रक्कम चारपटींहून अधिक आहे. सन २०२०-२१ मध्ये तीन हजार ८२४ कोटी, सन २०१९-२० मध्ये ३४ हजार ५१७ कोटी, तर सन २०१८-१९ मध्ये २१ हजार ४३ कोटी रुपये विविध योजनांसाठी न वापरल्याने परत गेले. शेती संशोधन आणि शिक्षण या एकट्या विभागाला सन २०२२-२३ मध्ये वितरित केलेल्या आठ हजार ६५८ कोटी रुपयांपैकी नऊ लाख, सन २०२१ २२ मध्ये १.८१ कोटी, सन २०२०-२१ मध्ये ६०० कोटी, सन २०१९-२० मध्ये २३२ कोटी आणि २०१८-१९ मध्ये ७.९ कोटी रुपये खर्चच करता आलेले नाहीत.

 

निधी का परत गेला?

केंद्राच्या शेती, पशुसंवर्धन व अन्न प्रक्रियेसंदर्भतील स्थायी समितीने निधी खर्च न होण्याबाबत सरकारचे लक्ष वेधले होते. सभापती पी. सी. गड्डीगौडर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निधी परत जाण्याची प्रवृत्ती शेतीसाठी हानिकारक असल्याचे निरीक्षणही नोंदविले. संसदेच्या पटलावर अहवाल ठेवला गेला. ईशान्येकडील राज्यांनी मागणी नोंदवली नाही, तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठीच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी न होणे, आदी कारणांमुळे हे प्रकार घडत असल्याचे सांगून कृषी विभागाने वेळ मारून नेली. निधी वाटप झाल्यानंतर त्याची योग्य व्यवस्था लावण्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, देखरेखीसाठी समांतर व्यवस्था का उभी केली गेली नाही आदी प्रश्नांची उत्तरे हा विभाग देऊ शकलेला नाही.

 

 

अहवालाचा सरळ अर्थ काय?

निवडणुकीच्या वर्षात हंगामी अर्थसंकल्पातही कृषीसाठी वाढीव निधीची घोषणा करून श्रेय घेतले जाऊ शकते. परंतु, पैसाच खर्च होत नसेल, तर अशा खैरातीला अर्थ नाही. देशभरात कर्जबारीपणासह विविध कारणांमुळे नैराश्य येऊन शेकडो शेतकरी आत्महत्या करतात. अशा स्थितीत शेतीप्रधान देशात पैसे सत्कारणी लागत नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या घोषणेला हरताळ फासण्याचा हा प्रकार आहे. हजारो कोटी रुपयांचा खर्च न करता येणे,ही कृषी मंत्रालयाची नामुष्की आहे. शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांच्या हातीही हा नवा मुद्दा मिळाला आहे. सरकार शेतकऱ्यांशी खेळ करत असून, शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या घोषणा ‘जुमला’च असल्याची ओरड होते आहे. अक्षम्य दुर्लक्षामुळे गरीब, कष्टकरी वर्ग योजनांपासून वंचित राहिल्याचा ठपका कृषी मंत्रालयावर आला आहे.

 

 

आता पुढे काय?

मंत्रालये निधी खर्च करीत नसतील तर पुढील तरतुदीत कपात होऊ शकते. शेतीसह मूलभूत क्षेत्रांसाठी असा पायंडा धोकादायक ठरू शकतो. राज्या-राज्यांतही निधी ‘घरवापसी’चे प्रकार घडत आहेत. मार्च जवळ आल्यानंतर अचानक जागे होऊन अखेरच्या काही दिवसांत पैसा खर्च झाल्याने योजना व गुणवत्तेशीही तडजोड होते. वाटप झालेल्या पैशाचे बारा महिन्यांसाठी समतोल नियोजन करून नेमक्या घटकांपर्यंत हा पैसा झिरपेल, यासाठी केंद्र व राज्यांच्या पातळीवर गांभीर्य हवे. सोबत स्वतंत्र देखरेख यंत्रणा आवश्यक आहे. करातून जमा होणारा पैसा तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायला हवा. तसे घडले, तरच दारिद्र्यातून बाहेर पडून हे घटक आत्मनिर्भर होऊ शकतील.

Post Views: 72
Previous Post

सिद्धेश्वर महायात्रेत भाकणूक विधी; गाईच्या वासराने सांगितलं कसे असेल २०२४ वर्ष

Next Post

गुरुनानक चौकातील अपूर्ण अवस्थेत हॉस्पिटलचे होणारे खाजगीकरण रद्द करा : आ. प्रणिती शिंदे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गुरुनानक चौकातील अपूर्ण अवस्थेत हॉस्पिटलचे होणारे खाजगीकरण रद्द करा : आ. प्रणिती शिंदे

गुरुनानक चौकातील अपूर्ण अवस्थेत हॉस्पिटलचे होणारे खाजगीकरण रद्द करा : आ. प्रणिती शिंदे

ताज्या बातम्या

अश्विनी तडवळकर यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा कला गौरव रत्न जाहीर #solapurnews #marathinews

May 21, 2026

आशा वर्करला आहे मदतीची आशा

May 21, 2026

मानेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; एकाच गावातील अनेक तरुण उच्च पदस्थ अधिकारी!

May 21, 2026
अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

May 21, 2026

सोलापूरचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी स्वीकारला पदभार

May 21, 2026
महापालिका सभागृह झाले ठंडा.. ठंडा.. कुल.. कुल.. एकूण 40 टन क्षमतेची बसविली 14 वातानुकूलित यंत्रणा 

महापालिका सभागृह झाले ठंडा.. ठंडा.. कुल.. कुल.. एकूण 40 टन क्षमतेची बसविली 14 वातानुकूलित यंत्रणा 

May 21, 2026

एम.पी.एस.सी. मोठा निर्णय; टायपिंग टेस्ट रद्द, गुणवत्तेच्या जोरावरच मिळणार सरकारी नोकरी

May 21, 2026
बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

May 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0874417

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697