Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहरातील ५४ मीटरचा रस्ता अंधाराच्या विळख्यात

तरुण भारतbyतरुण भारत
June 8, 2026
in solapur
0
शहरातील ५४ मीटरचा रस्ता अंधाराच्या विळख्यात
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शहरातील मारिआई चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडल्यानंतर विकसित करण्यात आलेला ५४ मीटर रुंदीचा रस्ता सध्या रात्रीच्या वेळी अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. मुक्ताई मंदिर ते सीएनएस हॉस्पिटल या परिसरात एकही पथदिवा नसल्याने वाहनचालक, पादचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
           हा रस्ता शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. दररोज हजारो वाहनांची ये-जा या मार्गावरून होत असते. परिसरात बस थांबा असल्याने रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ असते. तसेच नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र, रात्री पडताच संपूर्ण परिसर अंधारमय होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. काही दिवसांपूर्वी अंधारामुळे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला. वाहन उलटल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने चालक बचावला; मात्र या घटनेनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
        या मार्गावर किरकोळ अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “प्रशासनाला जाग येण्यासाठी आणखी किती अपघात व्हावे लागणार?” असा सवाल परिसरातील रहिवासी उपस्थित करत आहेत.
अंधारामुळे तळीरामांचा अड्डा
रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडत असल्याने काही ठिकाणी दारुड्यांचा वावर वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना असुरक्षित वाटत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पथदिव्यांची सुविधा उपलब्ध झाल्यास अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
तातडीने उपाययोजनांची मागणी
वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर तातडीने पथदिवे बसवून प्रकाशव्यवस्था सुरू करावी, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अंधारामुळे वाढणारा धोका लक्षात घेता प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या आहेत ठळक बाबी
– मुक्ताई मंदिर ते सीएनएस हॉस्पिटल परिसर पूर्णपणे अंधारात
– प्रमुख रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ
– बसथांबा असल्याने रात्री प्रवाशांची मोठी ये-जा
– महिलांमध्ये व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना
– तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी जोर धरतेय
Post Views: 74
Previous Post

​महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेली त्यांची निष्ठा हा आपल्या सर्वांसाठी एक महान आदर्श – नगरसेवक महेश इंगळे

Next Post

वटवृक्ष मंदिरात सुनिल जाजू व प्रशांत तांबे यांचा विशेष सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वटवृक्ष मंदिरात सुनिल जाजू व प्रशांत तांबे यांचा विशेष सत्कार

वटवृक्ष मंदिरात सुनिल जाजू व प्रशांत तांबे यांचा विशेष सत्कार

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907549

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697