बार्शी – भगवंत नगरीचे सुपुत्र, लोकनेते आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजय संपादन करुन आमदार झाल्याबद्दल बार्शी शहर हॉटेल असोसिएशनच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती उद्योजक मधुशेठ चांडक, व्यावसायिक सुनील अग्रवाल, जिवाजी कदम, विनोद चोप्रा, अभिजित राऊत, अध्यक्ष इम्तियाज भाई तांबोळी, अमर शेट्टी, संताजी सावंत, योगेश अग्रवाल, अनिल माने, राजाभाऊ कदम, बप्पा होनाळे, किरण कोकाटे, जोती कदम, विजय लड्डा, बुडुख मालक, सौरभ बालवडे, सचिन राऊत, पंकज बारबोले, दादा जानराव, दिपक तलवाड, सुदिप पाटील, विष्णू बोराडे, सागर मस्के, सांगोळे, सागर लंकेश्वर, विशाल अग्रवाल, विजय माने, स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी हॉटेल व्यावसायिक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले व बार्शी तालुक्याच्या अर्थकारणात नवीन उद्योग व्यवसाय यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले व यातूनच नवीन उद्योजक तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास बार्शी शहरातील हॉटेल व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.