Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

६२ वी खो-खो स्पर्धा : मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राचे वर्चस्व

तरुण भारतbyतरुण भारत
January 29, 2026
in sports
0
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: खो-खो संघटनेच्या मान्यतेने परळच्या ऐतिहासिक लाल मैदानावर वेग, चपळाई, डावपेच आणि जीवघेण्या झुंजींचा असा काही महाथरार रंगला की प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला! ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि तुफान गर्दीच्या साक्षीने पार पडलेल्या विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ व्या मुंबई व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुंबईच्या खो-खोचा खरा ‘कॅलिबर’ अनुभवायला मिळाला. पुरुष व्यावसायिक गटात मध्य रेल्वे, महिला व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वे, तर ४ फूट ११ इंच प्रायोगिक गटात यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने अजिंक्यपदावर मोहोर उमटवत मैदान गाजवले.

 

पुरुष अंतिम सामना – मध्य रेल्वेचा अंगावर शहारा आणणारा विजय

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पश्चिम रेल्वेचा २.४० मिनिटे राखून १३–१२ असा १ गुणाने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. मध्य रेल्वेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारले होते. या थरारक सामन्यावर देवेंद्र बर्डे यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले. मध्य रेल्वेच्या विजयात रामजी कश्यप (२.२०, नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), दिलीप खांडवी (१.१०, २ मि. संरक्षण व १ गुण), मिलिंद चावरेकर (१.२०, १.४० मि. संरक्षण व १ गुण), विजय हजारे (१.१०, १.४० मि. संरक्षण) अर्णव पाटणकर (१.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी निर्णायक योगदान दिले. तर पराभूत पश्चिम रेल्वेकडून महेश शिंदे (२.२०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), ऋषभ वाघ (१.२०, १.५० मि. संरक्षण), निखील सोडये, राहुल मंडल, मझहर जमादार (प्रत्येकी ३ गुण) यांनी दिलेली झुंज अखेर अपुरी ठरली.

 

महिला अंतिम सामना – पश्चिम रेल्वेचा ‘राजेशाही’ विजय

महिलांच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने आक्रमक खेळाचे दमदार प्रदर्शन करत रचना नोटरी वर्क्सचा ६–४ असा एक डाव राखून २ गुणांनी दणदणीत धुव्वा उडवत पराभव करत अजिंक्यपद पटकावले. पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. या सामन्याचे प्रमुख पंच कांती सरवैया होते. विजेत्या पश्चिम रेल्वेकडून संध्या सुरवसे (५ व नाबाद ३ मि. संरक्षण व १ गुण), अर्चना मांजी (४ मि. संरक्षण व २ गुण), तेजस्विनी के. आर. (नाबाद २ मि. संरक्षण), दिव्या गायकवाड, किशोरी मोकाशी (प्रत्येकी २ मि. संरक्षण), कल्याणी कंक व सुहानी धोत्रे (प्रत्येकी २ गुण) यांनी शानदार खेळ केला. तर पराभूत रचना नोटरी वर्क्सकडून साक्षी वाफेलकर (१ मि. संरक्षण व ४ गुण), गीतांजली नरसाळे (२.२० मि. संरक्षण), साक्षी तोरणे (१.३० मि. संरक्षण), काजल शेख (१.४० मि. संरक्षण) यांचा लढाऊ खेळ मोठ्या पराभवापासून संघाला वाचवू शकला नाही.

 

४ फूट ११ इंच गट – यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राचा विजयी डंका

४ फूट ११ इंच मुलांच्या प्रायोगिक निमंत्रित अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम साईश्वर सेवा मंडळावर ५–५ (पूर्वार्ध २–२, उत्तरार्ध १–१, जादा डाव २–२) अशी बरोबरी झाल्यानंतर लघुत्तम आक्रमणात ४.४९ मिनिटे राखून थरारक विजय मिळवला. विद्यार्थी क्रीडा केंद्राने नाणेफेक जिंकून संरक्षण निवडले होते. या सामन्याचे प्रमुख पंच अनिल गुरव होते. विद्यार्थी क्रीडा केंद्राकडून विग्नेश जाधव (२.१०, २.५०, ५.०७५ मि. संरक्षण व २ गुण), ओमकार जाधव (नाबाद १, नाबाद ७, नाबाद १.३० मि. संरक्षण व १ गुण), कार्तिक चोडणकर (३.५०, २.४० मि. संरक्षण) यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर पराभूत ओम साईश्वरकडून सार्थक गामी (३.३०, ४.५० मि. संरक्षण), आरव साटम (३, ५.१०, १.५० मि. संरक्षण), श्लोक जाधव (३ गुण) यांनी शेवटपर्यंत झुंज दिली.

 

दिमाखदार बक्षीस वितरण सोहळा

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थी क्रीडा केंद्राचे अध्यक्ष गजानन वाईरकर, कार्याध्यक्ष बाळ नाईक, सचिव पराग आंबेकर, मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव बाळासाहेब तोरसकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थी क्रीडा केंद्र व मुंबई खो-खो संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार

पुरुष :

▪️ सर्वोत्तम संरक्षक – महेश शिंदे (पश्चिम रेल्वे)

▪️ सर्वोत्तम आक्रमक – अर्णव पाटणकर (मध्य रेल्वे)

▪️ सर्वोत्तम अष्टपैलू – रामजी कश्यप (मध्य रेल्वे)

 

महिला :

▪️ सर्वोत्तम संरक्षक – अर्चना मांजी (पश्चिम रेल्वे)

▪️ सर्वोत्तम आक्रमक – साक्षी वाफेलकर (रचना)

▪️ सर्वोत्तम अष्टपैलू – संध्या सुरवसे (पश्चिम रेल्वे)

 

४ फूट ११ इंच गट :

▪️ सर्वोत्तम संरक्षक – विग्नेश जाधव (विद्यार्थी)

▪️ सर्वोत्तम आक्रमक – श्लोक जाधव (ओम साईश्वर)

▪️ सर्वोत्तम अष्टपैलू – कार्तिक चांदोरकर (विद्यार्थी)

Post Views: 125
Previous Post

अजितदादांच्या अकाली मृत्यूमुळे बार्शीत शोकाकुल वातावरण

Next Post

श्री  चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने 500 कोटी व्यवसायाचा टप्पा केला पार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री  चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने 500 कोटी व्यवसायाचा टप्पा केला पार

ताज्या बातम्या

शहराच्या विकासावर जिल्हाधिकाऱ्यांचा पत्रकार संघात पत्रकारांशी वार्तालाप

August 7, 2026

गुंगी गुडिया वक्तव्यावर बोलल्या सौ फडणवीस #viral

August 7, 2026

जरांगे पाटलांबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री #viral

August 7, 2026

अमित शहांनी राहुल गांधीच्या परदेशी वाऱ्याची कुंडलीच मांडली #viral

August 7, 2026

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव

August 7, 2026

आ.देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश सोलापूरचा साडीचा पारंपारिक वस्त्रोद्योगात समावेश

August 7, 2026

राज्यभरात बाईक टॅक्सी विरोधात वाहतूक संघटनेचे निवेदन

August 7, 2026

विडी कामगाराचा जल्लोष किमान वेतन हक्क समितीच्या लढ्याला मिळाले यश

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033185

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!