Sunday, May 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अजितदादांच्या अकाली मृत्यूमुळे बार्शीत शोकाकुल वातावरण

तरुण भारतbyतरुण भारत
January 29, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी बार्शीत समजतात शहरभर शोकाकुल वातावरण झाले. शहराच्या विविध भागात आणि चौकाचौकात अजितदादाच्या निधनाच्या बातमीची चर्चाच सर्वत्र सुरु होती. 

 उपमुख्यमंत्री असताना अजित पवार हे अनेक वेळा बार्शीत विविध राजकीय आणि विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. आमदार दिलीप सोपल यांच्यासह माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्याशी त्यांचे खूप घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. 

अजितदादांचा वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड वृत्तीमुळे ते बार्शीत देखील प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे सध्याच्या तरुणांना अजित पवार यांचे खूप मोठे आकर्षण होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजतात अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. अजित पवार यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील मोठा वचक होता त्यामुळे अजित पवार यांचा दौरा असल्यानंतर ते काय प्रश्न विचारतात यामुळे अनेकांची भंबेरी उडत होती. 

अजितदादा यांचे आणि माझे संबंध १९९१ पासून आजनपर्यंत होते. त्यांनी विकासाकडे बघत बार्शीला कधीच निधी कमी  पडू दिला नाही. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा दृष्टिकोन अजितदादा ठेवून असत. जातीच्या पलीकडे जाऊन ते नेहमीच राजकारण करत होते, अशी भावना आमदार दिलीप सोपल यांनी व्यक्त केली.

  अजित पवार यांची पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करण्याची पद्धत निश्चितच वाखाणण्याजोगी होती. मी विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील त्यांनी मला कधीच दुजाभाव न करता सढळ हाताने बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी निधी दिल्याची भावना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे महाराष्ट्राचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे, अशी भावना ही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. 

अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वस्व गेल्याची भावना निर्माण होत आहे. त्यांनी राजकारणात नेहमीच सहकार्य केल्यामुळेच आपण ठाम राहिलो अशी सद्गदित भावना माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी व्यक्त केली. 

शहरात आणि चौकात ठिकठिकाणी वातावरण सुन्न झाले होते. तर शहरातील सर्व शाळेत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करुन सर्व शाळा सोडून देण्यात आल्या. तीन दिवसाचा शासकीय दुःखवटा असल्याने नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा देखील अर्ध्यावर ठेवण्यात आला आहे.

तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज सर्वांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कामाबद्दल चर्चा करताना आ. दिलीप सोपल. 

Post Views: 33
Previous Post

अहिल्यादेवी यांनी समाजोपयोगी राज्य कारभार केला – कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर

Next Post

६२ वी खो-खो स्पर्धा : मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राचे वर्चस्व

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

६२ वी खो-खो स्पर्धा : मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राचे वर्चस्व

ताज्या बातम्या

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पी.बी. ग्रुपच्या वतीने मिठाई वाटप 

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पी.बी. ग्रुपच्या वतीने मिठाई वाटप 

May 3, 2026
नवीन कारची दुचाकीला धडक – पती-पत्नी जखमी

नवीन कारची दुचाकीला धडक – पती-पत्नी जखमी

May 3, 2026
मोठे बदल घडवण्यासाठी मोठी पदे आवश्यक : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

मोठे बदल घडवण्यासाठी मोठी पदे आवश्यक : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

May 3, 2026
बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’

बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’

May 3, 2026
कॅम्पस ड्राईव्हमध्ये सोजर फार्मसीचे यश

कॅम्पस ड्राईव्हमध्ये सोजर फार्मसीचे यश

May 3, 2026
वखारिया विद्यालयात सेवानिवृत्तांना निरोप

वखारिया विद्यालयात सेवानिवृत्तांना निरोप

May 3, 2026
वटवृक्ष मंदिर परिसरात वाहतुकी ची कोंडी

वटवृक्ष मंदिर परिसरात वाहतुकी ची कोंडी

May 3, 2026
नेताजी शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

नेताजी शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

May 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0843067

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697