बार्शी – येथील सुलाखे माध्य. व उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये शाळेची माजी विद्यार्थिनी व उपपरिवहन प्रादेशिक अधिकारी वर्ग -१ नागपूर पूर्व येथे कार्यरत असणाऱ्या अर्चना सोमेश्वर घाणेगावकर आडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंत कवठाळे, उपाध्यक्ष सौ. राजश्री पाटील, सर्व सदस्य, समाज कल्याण अधीक्षक व शाळेच्या माजी विद्यार्थीनी प्राजक्ता धस पवार तसेच १९८३ दहावी पासचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना घाणेगावकर यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांनी शालेय शिस्त तसेच अभ्यासाचे नियोजन करुन यश प्राप्त करता येते, असे सांगितले. आपल्या भाषणातून त्यांनी असे म्हटले की, शालेय जीवन हे पुन्हा येत नाही . सुलाखे हायस्कूलमुळेच मी आज या उच्च पदावर कार्यरत आहे .सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत क्रीडाशिक्षक माळी प्रमोद यांच्या मार्गदर्शन खाली सादर केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत व स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कदम जयसिंग यांनी केले. कार्यक्रमासाठी घाणेगावकर व आडके परिवार, संस्था सहसचिव उमेश ठोंबरे, सहसचिव श्रीकांत उपळेकर, उमेश पवार, संचालक संतोष तोडकरी, स्कूल कमिटी सदस्य संतोष पवार, मुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे, उपमुख्याध्यापक प्रसन्न देशपांडे, पर्यवेक्षक वैभव कदम, पर्यवेक्षिका उर्मिला जावळे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आजी-माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.