Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नारायण राणेंचा मुलगा खासदार होतो, तर मंत्री उदय सामंतांचा भाऊ खासदार का होऊ शकत नाही? रामदास कदमांचा सवाल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 19, 2023
in political
0
नारायण राणेंचा मुलगा खासदार होतो, तर मंत्री उदय सामंतांचा भाऊ खासदार का होऊ शकत नाही? रामदास कदमांचा सवाल
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नारायण राणेंचा मुलगा खासदार होतो, मग मंत्री उदय सामंतांचा भाऊ खासदार का होऊ शकत नाही, असा रामदास कदमांनी सवाल उपस्थित केला आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावरही वक्तव्य केले आहे.

 

गेले काही दिवस शांत असलेले शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोकणातील राजकीय स्थिती लोकसभा निवडणुका यापासून ते गेले कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा हायवेपर्यंत अनेक विषयांवर मोठे भाष्य केलं आहे. रामदास कदम हे स्पष्ट वक्ते आणि आक्रमक वक्तृत्व शैली असलेले नेते म्हणून ओळखले जातात. रामदास कदम यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे का खासदार होऊ शकत नाहीत? असा सवाल करत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे उदाहरण देत या जागेवर शिवसेना उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. गणेशोत्सवासाठी खेड तालुक्यात जामगे येथे आपल्या गावी आलेल्या रामदास कदम यांनी माध्यमांजवळ संवाद साधला.

 

ते म्हणाले की, नारायण राणे मंत्री होऊ शकतात त्यांचा मुलगा खासदार होऊ शकतो. मग उदय सामंत मंत्री होऊ शकतात, तर मग त्यांचा भाऊ किरण सामंत खासदार का होऊ शकत नाही. त्यामुळे किरण सामंत यांना आपला पाठिंबा आहे. पण निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांचे आहेत, असे सांगून भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर बोलणे टाळले. समृद्धी महामार्गाचे काम हे तीन वर्षात होऊ शकते तर कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प बारा वर्षानंतरही पूर्ण होऊ शकत नाही, याबद्दल जाहीर नाराजी रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. कशेडी बोगदा सुरू झाल्याने कोकणवासियांना दिलासा मिळाला. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे, त्याबाबत माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी नाराजी व्यक्त केली आणि सतेत असूनही नाराजी व्यक्त करत सरकारला घरचा आहे दिला.

 

समृध्दी महामार्ग तीन वर्ष होऊ शकतो मग मुंबई गोवा महामार्गाचे अद्याप पूर्ण का झाले नाही याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगून सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. पण भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजवर अनेकवेळा या मार्गाची पाहणी केली. त्यामुळे ते चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना यश येऊ दे. हा महामार्ग लवकर पूर्ण होऊन दे यासाठी आपल्या शुभेच्छा असल्याचे कदम यांनी सांगितले. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलाने कागदपत्रे देण्यास विलंब लावल्यामुळे निकाल लागण्यास वेळ लागला. मात्र सारे खापर विधानसभा अध्यक्षांवरती फोडले जाते आणि हे उद्धव ठाकरे गटाचे काही जण टीका करत आहे. उद्या अशी वेळ येईल की उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने आज जो काही निर्णय दिला आहे, त्याची अंमलबजावणी विधानसभा अध्यक्षांनी केलीच पाहिजे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचे माजी मंत्री रामदास कदम सांगितले. विधानसभा अध्यक्ष वकील आहेत त्यांचा अभ्यास आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. राज्यातील इतर सर्व रस्ते होतात मग कोकणावर हा अन्याय का याबाबत मला दुःख होते. मुख्यमंत्री यांची मी भेट घेतली आहे. नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. महामार्गाचे काम रखडवणाऱ्या ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याने निष्कृष्ट दर्जेचे काम केले. त्या ठेकेदावरती कारवाई झाली पाहिजे. त्याला ब्लॅकलिस्ट केलेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी मीडियाच्या माध्यमातून करत आहे. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गणपतीपूर्वी एक लाईन सुरू करू असे सांगितले होते पण ती सुरू झाली का ? नाही ना ? एक लाईन सुरू होण्यास १४ वर्ष लागली आहे. मग दुसरी लाईन सुरू करायला अजुन १४ वर्ष लागणार का? असा सवाल उपस्थित करत भाजपच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.

Post Views: 87
Previous Post

नाशिकमध्ये ईद-ए-मिलादचा जुलूस २९ ला निघणार

Next Post

मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारची तयारी, कर्मचारी वर्ग हजर, कामकाज संपेपर्यंत…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारची तयारी, कर्मचारी वर्ग हजर, कामकाज संपेपर्यंत…

मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारची तयारी, कर्मचारी वर्ग हजर, कामकाज संपेपर्यंत...

ताज्या बातम्या

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू #viral #marathinews #solapurnews

July 25, 2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली #viral

July 25, 2026
आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

July 24, 2026

बुधवारी श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

July 24, 2026
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

July 24, 2026

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

July 24, 2026
पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

July 24, 2026

गावकरी पाण्याच्या तर ठेकेदार निधीच्या प्रतिक्षेत 

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0997774

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!