चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मागील २ तासात धो-धो पाऊस बरसला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगल्या पावसाची आशा पल्लवीत झाल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. त्यानंतर लगेच कडक ऊन पडत असल्याने जणू काही ऊन-पावसाचा लपंडावच सुरू असल्याचा अनुभव चंद्रपूरसह वैदर्भीयांना येत आहे. पण आता चांगला पाऊस झाला आहे.परिणामी शहरातील सखल भागात पाणी साठले.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















