अन्यायकारक कायदे रद्द करणे, पारंपरिक व्यापार टिकवणे, तो वाढवणे आणि नव्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे. यासह व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि मागण्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी पुण्यात ५ ऑक्टोबरला राज्यस्तरीय व्यापारी परिषद होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
परिषदेचे आयोजन गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. या वेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री अब्दुल सत्तार, राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाचे अध्यक्ष सुनील सिंघी, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र चेंबरऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर, फेडरेशन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई), चेंबर असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड (मुंबई), द ग्रेन, राइस अँड ऑइल सीड्स मर्चंट्स असोसिएशन (मुंबई) आणि दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.





![न्यू कनिष्ठ [स्वतंत्र ] कला महाविद्यालय करजखेडा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2026/09/17-saptbar-01.jpg?resize=120%2C86&ssl=1)
















