Friday, September 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘एक तारीख एक घंटा एक साथ’चे आवाहन जगातील सर्वांत मोठा स्वयंसेवी उपक्रम ठरेल – हरदीप पुरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 30, 2023
in india
0
‘एक तारीख एक घंटा एक साथ’चे आवाहन जगातील सर्वांत मोठा स्वयंसेवी उपक्रम ठरेल – हरदीप पुरी
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एक तारीख एक घंटा एक साथ”, म्हणजेच स्वच्छतेसाठी श्रमदान, हा स्वच्छतेला समर्पित असलेला उपक्रम आहे. प्रतिज्ञा, दौड, रांगोळी स्पर्धा, भित्तीचित्रे, नुक्कड नाटक यासारख्या उपक्रमांपेक्षा तो पूर्णपणे वेगळा आहे. श्रमदान हे केवळ देशभरातील स्वच्छता मोहिमेसाठी आहे, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे अधोरेखित केले.

1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सर्व देशवासीयांनी एकत्र येऊन स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करावे, आणि महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘स्वच्छांजली’ वहावी, असे आवाहन पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमाच्या 105 व्या भागात केले आहे. या महा स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व स्तरातील नागरिकांनी बाजारपेठा, रेल्वे मार्ग, जल साठे, पर्यटन स्थळे, प्रार्थनास्थळे यासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, जेणे करून या जागा स्वच्छ दिसतील असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘स्वच्छता ही सेवा’ या विषयावर प्रसार माध्यमांशी बोलताना ते आज म्हणाले की, देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागांतील 6.4 लाखाहून जास्त स्थळे श्रमदानासाठी निश्चित करण्यात आली आहेत. रेल्वे मार्ग आणि स्थानके, विमानतळ आणि आजूबाजूचा परिसर, रस्त्याच्या लगतच्या जागा, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कडेच्या जागा , जलसाठे, घाट, झोपडपट्ट्या, पुलांखालील जागा, बाजारपेठा, गल्ल्या, प्रार्थनास्थळे, पर्यटन स्थळे, बस स्थानके/टोल प्लाझा, प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव क्षेत्र, गोशाळा, टेकड्या, समुद्रकिनारे, बंदरे, निवासी क्षेत्रे, अंगणवाड्या, शाळा/महाविद्यालये, यासारख्या कचरा प्रवण जागा स्वच्छ करणे, हे या महा स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट आहे.

स्वच्छता कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत, यासाठी शहरांमधील स्थानिक संस्था, शहरे, ग्रामपंचायती, मंत्रालयांनी स्वच्छता ही सेवा, https:wachhatahiseva.com/ या पोर्टलवर स्वच्छता श्रमदान कार्यक्रमांची माहिती दिली आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या या माहिती तंत्रज्ञान व्यासपीठावर नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरातील स्वच्छता उपक्रमांची माहिती मिळेल आणि ते यामध्ये सहभागी होऊ शकतील. विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभागी झालेले नागरिक स्वच्छतेसाठी श्रमदान करताना स्वतःची छायाचित्रे काढून या पोर्टल वर अपलोड करू शकतील. नागरिकांना आणि प्रभावशाली व्यक्तींना या आंदोलनात सहभागी होण्याचे आणि स्वच्छता दूत बनून या लोक चळवळीचे नेतृत्व करण्याचे आवाहन करणारा एक विभाग या पोर्टलवर आहे. जवळजवळ एक लाख निवासी भागांमध्ये स्वयंसेवक म्हणून श्रमदान करण्यासाठी मोठ्या संख्येने रहिवासी कल्याणकारी संघटना पुढे आल्या असून, देशभरातील सुमारे 35,000 अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान करायला ग्रामीण भागातील नागरिक पुढे आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महा स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागांमधील स्वयंसेवी संस्था, बाजार संघटना, स्वयं सहाय्यता गट, धार्मिक गट, व्यापार मंडळे, खासगी क्षेत्र पुढे आले असून देशातील 22,000 बाजार पेठा, 10,000 जलसाठे, जवळजवळ 7,000 बस स्थानके/टोल प्लाझा, जवळजवळ 1000 गोशाळा, जवळजवळ 300 प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव क्षेत्र आणि अन्य ठिकाणच्या स्वच्छतेसाठी ते श्रमदान करतील.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, लष्कर, नौदल, हवाई दल प्रथमच सर्वसामान्य नागरिकांबरोबर एकत्र येऊन रेल्वे मार्ग, हेरिटेज इमारती, पायऱ्यांच्या विहिरी, किल्ले या ठिकाणची स्वच्छता करतील.

देशभरातील संग्रहालये, स्मारके आणि किल्ले स्वच्छ करण्यासाठी विविध संघटना पुढे आल्याचे हरदीप सिंह पुरी यांनी नमूद केले.शाळा आणि महाविद्यालयांमधील स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून 1 ऑक्टोबर रोजी फिक्की, भारतीय उद्योग महासंघ क्रेडाई, श्री सत्य साई लोक सेवा, लायन्स क्लब, रोटरी क्लब, युनिसेफ, आगा खान फाउंडेशन यासारख्या इतर संस्था या उपक्रमात सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात 62,000 पेक्षा अधिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाणार असून, चौपाट्या, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, जलसाठे आणि इतर सार्वजनिक स्थळांवरील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नागरिक श्रमदान करतील.

मागील काही वर्षांप्रमाणेच, या वर्षी देखील, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय (MoHUA) आणि पेयजल आणि स्वच्छता विभागाने (DDWS) इतर सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सहयोगाने, स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता हीच सेवा (SHS) 2023, चे आयोजन केले आहे.

Post Views: 187
Previous Post

स्टार्टअप उद्योग भारताच्या अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांच्या प्रवासासाठी दिशादर्शक – डॉ जितेंद्र सिंह

Next Post

फडणवीसांच्या आश्वासनानंतर ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगेंनी सोडले उपोषण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
फडणवीसांच्या आश्वासनानंतर ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगेंनी सोडले उपोषण

फडणवीसांच्या आश्वासनानंतर ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगेंनी सोडले उपोषण

ताज्या बातम्या

मित्राने वाढदिवसानिमित्त वडिलांचा व्हिडिओ भेट दिला आमदार कोठेनी भावुक होत केला शेअर

September 11, 2026

सोलापूर विकास मंचचे एअरपोर्ट डायरेक्टरना निवेदन #solapurnews

September 11, 2026

प्रवीण दरेकरांनी जरांगेंना म्हणाले #viral #marathinews #news

September 11, 2026

शाळेत दहा वर्षीय विद्यार्थिनीला सापसदृश प्राण्याचा दंश; शाळेच्या हलगर्जीपणावर संताप #viral#solapur

September 11, 2026

यंदा गणराय असणार बारा दिवस पंचांगकर्ते मोहन दातेंची माहिती#solapurnews #news #viral

September 11, 2026
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

September 10, 2026
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा जागर; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ संपन्न

September 10, 2026
आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

आटपाडीतील अन्य अतिक्रमणांना भाजपाचा पाठींबा आहे का ?

September 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1190668

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!