Monday, March 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समृध्द जीवनासाठी रविंद्रनाथ टागोर यांचे स्मृतीशिल्प प्रेरणादायी – न्यायमूर्ती भूषण गवई

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 8, 2023
in maharashtra
0
समृध्द जीवनासाठी रविंद्रनाथ टागोर यांचे स्मृतीशिल्प प्रेरणादायी – न्यायमूर्ती भूषण गवई
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या भित्तीचित्राचे स्मृतीशिल्प प्रेरणा देणारे ठरेल. त्यांच्या विचारांचे अनुकरण आणि प्रेरणा घेऊन जीवन समृध्द होईल, असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले.

येथील जिल्हा न्यायालयात गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या भित्तीचित्राचे अनावरण न्यायमूर्ती श्री. गवई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी, महाराष्ट्र, गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष विवेक घाटगे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे सदस्य संग्राम देसाई आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले, रत्नांची खाण असणाऱ्या जिल्ह्यात गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे आयसीएस असणारे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे येथे जिल्हा न्यायाधीश होते. या कालावधीत गुरुदेव टागोरांनी याठिकाणी काव्य लेखन केले. आठव्या वर्षी त्यांनी कविता करायला सुरुवात केली. सोळाव्या वर्षी त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. कवी मनाच्या टागोरांनी शेक्सपिअरच्या साहित्याचे अध्ययन केले. मुक्त शिक्षणाची संकल्पना आणून शांतीनिकेतन सुरु केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना समिती समोरील भाषणे वाचली, तर देशाची घटना काय आहे, याची कल्पना येईल. बाबासाहेबांची या देशाकरिता, नागरिकांकरिता काय तळमळ होती, हे या भाषणांतून दिसून येते. सर्वसामान्य जनतेला राजकीय बरोबर, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळायला हवा, हे त्यांचे ब्रीद होते, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ हवे

हर्बर लिंकमुळे पुण्याचा माणूस मुंबईला दोन तासात जाऊ शकतो. परंतु, चंदगडसारख्या टोकाच्या तालुक्यातील तसेच कर्नाटक सीमेवरील गावांतील व्यक्ती मुंबईला इतका प्रवास करुन जाणं, हे अत्यंत खर्चिक आहे. त्याचा वेळ आणि खर्च वाचविण्यासाठी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हायला हवे. त्याबाबत उच्च न्यायालय सकारात्मक विचार करेल, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती श्री. उपाध्याय म्हणाले, आजचा हा सोहळा ऐतिहासिक आहे. कोकणभूमी ही पवित्र भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांची ही भूमी वीर सावरकरांची आठवण करुन देणारी कोकण भूमी आहे. देशाचे आयकॉन असणारे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी काही काळ याठिकाणी वास्तव्य केले. आपल्या देशाचे आणि बांग्लादेशाचे राष्ट्रगीत त्यांनी लिहीले. ‘विपत्तीमध्ये तू माझं रक्षण करं, ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये, एवढीच माझी इच्छा’, अशी प्रार्थना गुरुदेवांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचलं तर चांगले आणि चांगले काम कसे करावे, हे शिकायला मिळते, असेही ते म्हणाले.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरीकरांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. मंडणगड येथील कामकाजाला आणि इथल्या कार्याला निधी देण्याचे भाग्य मला मिळाले, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. न्याय व्यवस्था नम्र असते, हे देशाच्या न्याय व्यवस्थेने दाखवून दिले आहे. बार कौन्सीलसाठी आवश्यक असणाऱ्या जागेसाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.

बहुआयामी व्यक्तीमत्व गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचे हे शिल्प प्रेरणा देणारे आहे, ते सदैव प्रेरणा देत राहील, असे विचार पालक न्यायमूर्ती श्री. जामदार यांनी व्यक्त केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन पार्श्वभूमी सांगितली.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष श्री. घाटगे, सदस्य श्री. देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप धारिया यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर. एन .जोशी, माजी न्यायमूर्ती पी.आर. बोरा, प्रबंधक निरिक्षक ए. डी. बिले, माजी न्यायाधीश एम.डी. केसरकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदीसंह वकील उपस्थित होते.

Post Views: 138
Previous Post

उत्तम कायदा आणि सुव्यवस्था ही विकासाची पहिली अट – अमित शाह

Next Post

४ दिवस शांततेत आंदोलन, सरकारला फरक पडत नाही म्हणत राज ठाकरेंनी अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यायला लावलं !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
४ दिवस शांततेत आंदोलन, सरकारला फरक पडत नाही म्हणत राज ठाकरेंनी अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यायला लावलं !

४ दिवस शांततेत आंदोलन, सरकारला फरक पडत नाही म्हणत राज ठाकरेंनी अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यायला लावलं !

ताज्या बातम्या

एकाच घरात पती-पत्नीचे मृ.त.दे.ह सापडले..

March 16, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षक सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

March 16, 2026
महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

महसुल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवतर लाभार्थ्यांची कामे करावीत

March 16, 2026
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान; विवीध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या महीलांचा गौरव

March 16, 2026
जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर स्वीकृत पदी शंकरराव वाघमारे यांची निवड करा

March 16, 2026
जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

जागतिक महिलादिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला कायदेविषयक शिबिर संपन्न 

March 16, 2026

स्वागत नगर रोडवरील कृष्णा नगर परिसरात रविवारी सकाळी एका घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याची घटना

March 16, 2026
पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर : मुल्ला

पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर : मुल्ला

March 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0738276

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697