Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छगन भुजबळ दंगल भडकविण्याचं काम करतायेत, आरक्षण मिळू द्या, त्यांना सरळ करायला वेळ लागणार नाही : मनोज जरांगे पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 5, 2023
in maharashtra
0
छगन भुजबळ दंगल भडकविण्याचं काम करतायेत, आरक्षण मिळू द्या, त्यांना सरळ करायला वेळ लागणार नाही : मनोज जरांगे पाटील
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकोला : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची आज अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चरणगावात जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. “हा दोन जातीत दंगल भडकवायला लागलाय. मराठा ओबीसीतच आहे हे माहिती झाल्याने तो दंगल भडकावण्याचे प्रयत्न करतोय. त्याचं स्वप्नं पूर्ण होऊ देऊ नका”, अशी जहरी टीका जरांगे पाटील यांनी केली. त्याचवेळी धनगरांनी भुजबळांना पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केलं.

जरांगे पाटील भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले की, “आज अकोल्यातील एवढ्या छोट्या गावात एवढी गर्दी होतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. आरक्षण असलेले मराठेही आज ताकदीने या आंदोलनात सोबत येत आहेत, हा सरकारसाठी इशाराच आहे. दरम्यान आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या भावांसाठी समोर यावं. राजकीय फायद्यासाठी राजकीय नेते आपल्यात उभी फूट पाडायचा प्रयत्न करतील असं होऊ देऊ नका”

छगन भुजबळांवर टीका करत जरांगे म्हणाले की, “तो छगन भुजबळ स्वत:ला ओबीसींचा नेता मानतो. ओबीसींमधील छोट्या जातींवर तो अन्याय करतो. दरम्यान ओबीसी आरक्षणातील छोट्या जातींचे २९ नेते मला भेटलेत. ते भुजबळांना आपला नेता मानत नाहीत. भुजबळ ओबीसींचं एकटंच खातोय. इतकेच नव्हे तर भुजबळांना त्यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी धनगर आणि इतर लागतात. पण त्यांच्या आरक्षणावर बोलत नाही. त्यामुळे धनगरांनी भुजबळांच्या मागे राहू नये”.

भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे राज्यात दंगे उसळवणं

दरम्यान, अंबडला याने सर्व जातीचे लोक बोलवले. परंतु मुंबईला जाईपर्यंत धनगर आणि ओबीसींचं चार नेते फुटले. याच्या मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे राज्यात दंगे उसळवणं आणि राजकीय कारकीर्द पणाला लावणं, अशी टीका करताना जरांगे पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख केला. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश हे सरकारसाठी कर्मप्राप्त आहे, असंही ठामपणे जरांगे

आम्हाला ओबीसी आरक्षणात का येऊ द्यायचं नाही?

आज खानदेशी आणि विदर्भातील मराठ्यांना यात उतरण्याची विनंती आहे, आम्ही तुमचं काय पाप केलंय. तुम्हाला आम्हाला का ओबीसी आरक्षणात येऊ द्यायचं नाही. भुजबळांनी कितीही आडवा आलं तरी आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आज सुरू असलेलं भुजबळांचं षडयंत्र मोडून काढणार आहोत, असंही ते म्हणाले.

मराठ्यांच्या एकजुटीचा विजय

आतापर्यंत ३५ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. याच आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं याचा कायदा २४ डिसेंबरला पारीत होणार असल्याचे ते म्हणाले. दिलेल्या शब्दाला जागा आणि लिहून दिलेल्या आश्वासनांत बदल केला तर सुट्टी देणार नाही. आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आमच्या मदतीला यावं. दरम्यान मराठ्यांच्या नोंदी असतांना त्यांना आरक्षण मिळू दिलं नाही. आता नोंदी मिळू लागल्यात हा मराठ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

सरकारचं माझ्याविरोधात षडयंत्र

सरकारने माझ्याविरोधात अनेक षडयंत्र रचली आहेत. माझी तपासणी करणाऱ्या डॉक्टरने मला एक किडनी नसल्याची चुकीची माहिती दिली आहे. सरकारचे मंत्री रात्री मुंबईत बसून मला फसवायचा डाव रचायचे, असा जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केला आहे.

Post Views: 75
Previous Post

आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर मिचॉंग चक्रीवादळ धडकले

Next Post

काळे झेंडे दाखवले, गाडी जाताच गोमूत्र शिंपडलं, ओबीसी बांधवांकडून मनोज जरांगेंचा निषेध

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
काळे झेंडे दाखवले, गाडी जाताच गोमूत्र शिंपडलं, ओबीसी बांधवांकडून मनोज जरांगेंचा निषेध

काळे झेंडे दाखवले, गाडी जाताच गोमूत्र शिंपडलं, ओबीसी बांधवांकडून मनोज जरांगेंचा निषेध

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677490

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697