काँग्रेसचे ओडिशातील खा.धीरज साहू यांच्या निवासस्थानी आणि इतर मालमत्तांमधून प्राप्तिकर विभागानं ३५० कोटींहून अधिक रोकड जप्त करताच सोमवारी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या जोडबसवण्णा चौक, टिळक चौक,विजापूर नाका, आदी ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आली.याचाच एक भाग म्हणून टिळक चौकात भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाल निदर्शने करण्यात आली तर भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या जोडबसवण्णा चौकइथ जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी साहू यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं.देशाच्या विकासाला प्राधान्य देण्यात पेक्षा काँग्रेस आणि काॅग्रेस पक्षाच्या नेत्यानी स्वहिताला अधिक प्राधान्य दिल्याने देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे असा आरोप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केला. काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी मोदी आणि त्याचे सरकार सक्षम आहे, म्हणूनच अशा काँग्रेस नेत्यांची पोल खोल केली जात असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...