Saturday, March 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिरुरची जनता निधीपेक्षा मूल्य आणि तत्त्वाला जास्त महत्त्व देते; अमोल कोल्हेंचं अजितदादांना प्रत्युत्तर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 26, 2023
in maharashtra
0
शिरुरची जनता निधीपेक्षा मूल्य आणि तत्त्वाला जास्त महत्त्व देते; अमोल कोल्हेंचं अजितदादांना प्रत्युत्तर
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंविरोधात प्रबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला होता.

 

 

मी एका सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणे, हा मी एकप्रकारे माझा गौरवच समजतो. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकालाच आपली ताकद आजमवण्याचा अधिकार आहे. शेवटी कोणाला जिंकवायचे, हा निर्णय मायबाप जनता घेत असते. हीच गोष्ट शरद पवार साहेबांनी मला सांगितली. माझा शिरुरमधील जनतेवर पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे समोर कोणीही उमेदवार असला तरी मी माझं काम घेऊन लोकांसमोर जाईन, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना अजित पवार यांनी नुकतीच केली होती. याविषयी अमोल कोल्हे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी म्हटले की, आदरणीय अजितदादा हे मोठे नेते आहेत. ते माझ्यावर टीका करत आहेत. पण मी आहे तिथेच आहे, त्यांनी भूमिका बदलली आहे. त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं. पण अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणं, हा माझा गौरव आहे, असे कोल्हे यांनी म्हटले.

 

 

अजित पवार हे आमचे नेते होते. त्यामुळे अजित पवार यांना उलट उत्तर देणे हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणारे नाही. अजित पवार यांच्याविषयी आजही माझ्या मनात व्यक्ती म्हणून आदर आहे. मी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. माझ्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा १०० टक्के वाटा आहे. येथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले, त्यामध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. या मतदारसंघात आठ धरणं कोणाच्या काळात झाली? शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांच्या धोरणांमुळे शिरुरमधील शेतकऱ्यांचा फायदा झाला, ते सुखी झाले. चाकण, रांजणगाव, सणसवाडी एमआयडीसी; हडपसर आणि मगरपट्टा येथील आयटी पार्कच्या उभारणीत शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. २०१९च्या निवडणुकीत आम्ही शरद पवार साहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेऊन काम केले होते.

 

 

मी २०१९ मध्ये ज्याठिकाणी होतो, २०२३ मध्येही त्याचठिकाणी आहे. पण अजित पवार आणि इतर आमदारांनी भूमिका बदलली, हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. अजित पवार यांच्याशी झालेल्या खासगी चर्चेचा तपशील मी उघड करणार नाही. खासगीतील चर्चा सार्वजनिक करायची नसते, हा संकेत आहे. अजित पवार यांनी तो काहीप्रमाणात मोडला असला तरी मी तसे करणार नाही. खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये मला दोनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. त्यानंतर शिवस्वराज्य यात्रा आणि २०१९मधील विधानसभा प्रचार आणि आमदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. त्यामुळे आता त्यांनी एक वेगळं विधान केलं म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार मी सुसंस्कृत राजकारणाची वाट चालणार आहे. शिरुर मतदारसंघातील लोक केवळ निधीपेक्षा तत्व आणि मूल्य या गोष्टीला अधिक महत्त्व देतात, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Post Views: 97
Previous Post

आदल्या दिवशी साजरा केला वाढदिवस अन् दुसऱ्याच दिवशी मृत्यू; अवघ्या ३२ वर्षीय कॉमेडियनचे निधन

Next Post

शेतकरी नेते रविकांत तुपकर छ. संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शेतकरी नेते रविकांत तुपकर छ. संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीला

शेतकरी नेते रविकांत तुपकर छ. संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीला

ताज्या बातम्या

13 March 2026

March 13, 2026

गॅसच्या संदर्भात ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी ..काय म्हणाले ते एकदा पहाच

March 13, 2026

१० ते ३०० टक्क्यांपर्यंत फायदा मिळवून देतो असे सोगून ७२ लाख ६४ हजारांना फसवल्या

March 13, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 13, 2026

पहा काय म्हणाले … पाणीपुरवठया संदर्भात अधिकारी …

March 13, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 13, 2026
पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

March 13, 2026
वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

March 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0731151

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697