बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद रमेश हंचाटे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेअंतर्गत इतिहास विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन: एक ऐतिहासिक अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक व नैसर्गिक अशा एकूण ३४ पर्यटनस्थळांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यांनी आपले संशोधन ए.आर. बुर्ला महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. तुकाराम नारायण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. संशोधनाच्या विविध टप्प्यावर त्यांना माजी प्राचार्य डॉ. सोपान जावळे व श्री श्रीधर महिंद्रकर यांचे मार्गदर्शन व श्री सतीश हंचाटे, श्री नितीन मुसळे, श्री अश्विन संगवे, श्री सुमित औसेकर यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या यशाबद्दल बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापू ढगे व सचिव श्री विजय पुकाळे यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.