Saturday, November 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

तरुण भारतbyतरुण भारत
November 21, 2026
in west maharashtra
0
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समिती सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. सध्या संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे. आपण सर्वजण येथे वारकरी भावनेने येतो. सर्वसामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने व कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होऊन वारकऱ्यांना लवकर दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
वारीच्या नियोजनाबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला असून, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू असलेल्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांना तातडीने मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
कार्तिकी यात्रेच्या नियोजनात जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, सूचनांची तत्परतेने अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्या कामाचे कौतुक केले. या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी तत्परतेने आणि धडाडीने निर्णय घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पास त्यांना प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी २०२७’ चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले, तर आभार कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मानले.
——————
चौकट : (कार्तिकी यात्रेत सुधाकर शिंदे दाम्पत्य मानाचे वारकरी)
कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे (वय ५८) व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे (वय ५१) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड झाली.शिंदे दाम्पत्य गेल्या ११ वर्षांपासून नियमित वारी करत असून, त्यांना सुशील व प्रणव हे दोन मुलगे आणि गायत्री व संस्कृती या दोन मुली आहेत. श्री. सागर महाराज वाशिमकर यांच्या मार्गदर्शना खालील वारकरी परंपरेशी जोडलेले हे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून माळकरी असून, शेती व्यवसाय सांभाळत भक्तिभावाने वारकरी संप्रदायाची परंपरा जपत आहेत.
Views: 9
Previous Post

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

तरुण भारत

तरुण भारत

ताज्या बातम्या

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

November 21, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

November 21, 2026

जि.प.च्या सर्व साधारण सभेत ३९.५६ कोटींच्या कामांना हिरवा कंदील!

November 21, 2026
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

November 21, 2026
नागनळळी आश्रमशाळेची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार भरारी!

नागनळळी आश्रमशाळेची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार भरारी!

November 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1544872

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!