Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘रोहित बाद, आता काय मुंबई जिंकणार’, चाहत्यांना राग, डोक्यात वार करुन एकाची हत्या

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 13, 2024
in maharashtra
0
‘रोहित बाद, आता काय मुंबई जिंकणार’, चाहत्यांना राग, डोक्यात वार करुन एकाची हत्या
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘आयपीएल’मध्ये कोट्यवधी रुपयांची बोली लावली जाते, त्यातून ते कोट्यवधींचे मानकरी होतात, प्रायोजकही मालामाल होतात; पण त्यांचा खेळ पाहणारे चाहते केवळ ईर्ष्येपोटी एकमेकांचा जीव घेत आहेत. ‘आयपीएल’चा ज्वर वाढत असून, चाहत्यांमध्ये होत असलेल्या वादाने डोकी फोडण्यापासून ते खुनापर्यंत प्रकरण पोहोचत आहे. कोल्हापुरात ‘मुंबई इंडियन्स’च्या चाहत्याने ‘चेन्नई सुपरकिंग्ज’च्या चाहत्यावर केलेला हल्ला, त्यातून त्याचा गेलेला जीव पाहता ही ईर्ष्या कोणत्या टोकाला जाते हे दिसून येते.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी येथे गेल्या आठवड्यात एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे कारण होते सध्या सुरू असलेली आयपीएल. सागर झांजगे व बळवंत झांजगे हे दोघे काका-पुतण्या. दोघेही ‘मुंबई इंडियन्स’चे चाहते आहेत. त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या गायकवाड यांच्या घरात बसून क्रिकेट पाहायचे. गेल्या आठवड्यात हैद्राबाद संघाने धावांचा डोंगर रचला. त्यामुळे दोघेही नाराज आणि संतप्त होते. त्यातच मुंबईचा रोहित आउट झाला. त्याच वेळी ‘चेन्नई सुपर किंग्ज’चे चाहते असलेले बंडोपंत तिबिले तिथे आले. ‘रोहित झाला बाद, आता काय मुंबई जिंकणार,’ असे म्हणून त्यांनी अन्य दोघांना डिवचले.

 

रोहित बाद झाल्याने अगोदरच रागात असलेल्या झांजगेंना तिबिलेंचा राग आला. त्यातूनच बळवंत झांजगे यांनी तिबिलेच्या डोक्यावर शेजारी असलेली फळी मारली. त्यानंतर सागरनेही काठी मारल्याने तिबिले तिथेच बेशुद्ध पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दुसऱ्या दिवशी त्यांचा अंत झाला. एकाचा जीव गेला, दोघांना अटक झाली. म्हणजे तीन कुटुंबांना या वादाची झळ पाहोचली.

 

प्रकरण डोकी फोडण्यापर्यंत

बंडोपंत आणि बळवंत हे दोघेही जवळचे मित्र. रोज एकत्र बसून सामना पाहणारे हे दोघे मात्र वेगवेगळ्या संघाचे चाहते. त्यातून वाद झाला, वाढला आणि प्रकरण डोकी फोडण्यापर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथेही संघाचे फलक लावण्यावरून दोन संघांच्या चाहत्यांमध्ये तुफान मारामारी झाली होती. यावर्षी जीव घेण्यापर्यंत मजल गेली. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई या दोन संघातील चाहत्यांमध्ये जोरदार खुन्नस असते. यातूनच ग्रामीण भागात आणि चौकाचौकात खेळाडूंचे फलक झळकवले जात आहेत.

खेळ हा आनंद लुटण्यासाठी असतो. खेळताना जिंकण्याची जिद्द आणि ईर्षा ठीक आहे; पण पाहताना केवळ आनंदच महत्त्वाचा. भावनिकता महत्त्वाची नाही. क्षणिक रागापोटी टोकाला जावून आपल्या हातून कोणतेही अतिरेकी कृत्य होऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी.
– डॉ. धनंजय पाटील, मानसोपचारतज्ज्ञ

Post Views: 48
Previous Post

सोन्याची चमक होणार लाखमोलाची… इराण-इस्रायलने टेन्शन वाढवलं, वाचा सविस्तर

Next Post

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका; संपूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, PM मोदींची घोषणा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका; संपूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, PM मोदींची घोषणा

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका; संपूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, PM मोदींची घोषणा

ताज्या बातम्या

वेळापूर गरुड बंगल्यावर लोकप्रतिनिधींचा सन्मान

February 15, 2026

दत्त प्राथमिक विद्यामंदिर,बार्शी येथे बक्षिस वितरण संपन्न

February 15, 2026

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

February 15, 2026

दिलीपराव सोपल प्रशालेत १० वी च्या विद्यार्थ्यांचानिरोप समारंभ

February 15, 2026

दिल्लीमधील गोभक्त महिला संमेलनामध्ये महिला गोभक्तांचा सन्मान 

February 15, 2026

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेत भव्य टेक्निकल प्रदर्शनाचे आयोजन

February 15, 2026

संस्कार संस्कृती व ज्ञान देणारी संस्था म्हणजे एन के किड्स स्कूल

February 15, 2026

वैरागची लेक बनली ‘कृषी उपसंचालक’; एकता महिला मंचतर्फे कु. प्राची गोवर्धन यांचा भव्य गौरव

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680631

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697