Tuesday, March 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली, गेल्या १० वर्षाच्या कारकिर्दीबाबत मोदींचा दावा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 24, 2024
in india
0
भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली, गेल्या १० वर्षाच्या कारकिर्दीबाबत मोदींचा दावा
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘ईडी आणि अन्य तपास यंत्रणांवर आरोप करणारे विरोधक त्यांच्यावर चुकीचे आरोप करण्यात आले असल्याचे एकाही प्रकरणात सिद्ध करू शकलेले नाहीत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची इतकी चर्चा होत असलेली कदाचित ही पहिलीच निवडणूक असावी. कारण गेल्या १० वर्षांत भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. निवडणूक प्रचारात व्यग्र असतानाही पंतप्रधान मोदी अशा विविध मुद्द्यांवर दिल्लीमध्ये ‘नवभारत टाइम्स’चे आशीष पांडे आणि नरेंद्र नाथ यांच्याशी मोकळेपणाने बोलले.

 

निवडणुकीत भाजप केवळ मोदी लाटेवर अवलंबून असल्याचा तर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला. या मुद्द्यावर प्रथमच विस्ताराने बोलताना ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष एक चमू म्हणून संघभावनेने काम करतो. या चमूमधील प्रत्येक जण निवडणूक जिंकण्यासाठी मेहनत करीत आहे. घराणेशाही जपणाऱ्या पक्षांमध्ये मात्र कुटुंब किंवा एखादी व्यक्ती खूप महत्त्वाची असते. आमच्या पक्षामध्ये प्रत्येक नेता व कार्यकर्त्यावर जबाबदारी टाकली जाते.’ दिल्लीतील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीबाबत पंतप्रधान म्हणाले की, विरोधकांच्या ‘इंडिया’चे घटक पक्ष दोन गोष्टींसाठी ओळखले जातात… एक भ्रष्टाचार आणि दुसरा निर्लज्जपणे खोटे बोलणे.

 

गेल्या १० वर्षांमध्ये महागाई आणि बेरोजगारी वाढली असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचाही पंतप्रधान मोदी यांनी या विशेष मुलाखतीत सविस्तर समाचार घेतला. ‘यूपीएच्या काळात महागाईचा दर दुहेरी अंकात असायचा. सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात युद्धाची परिस्थिती आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर झाला आहे. तरीही आमच्या सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ होऊ दिली नाही. गेल्या १० वर्षांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. लाखो तरुणांना सरकारी नोकरी मिळाली आहे. खासगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत’, असे मोदी यांनी सांगितले.

 

डीपफेक आणि कृत्रिम प्रज्ञा या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगावर पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोट्या बातम्या आणि कपोलकल्पित घटनांशी काहीही संबंध नाही’, असे ते म्हणाले. आपले सरकार आल्यास काहीही झाले तरी ठरलेल्या वेळेत महिला आरक्षण लागू होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

 

वाराणसीच्या आपल्या खासदारकीच्या कार्यकाळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘इथे प्रत्येक काम केवळ गंगामातेच्या आशीर्वादानेच फलदायी ठरते. १० वर्षांपूर्वी जेव्हा मी म्हणालो होतो की, गंगामातेने मला बोलावले आहे, तेव्हा मी ते त्याच भावनेने सांगितले होते.’ आता गंगामातेने आपल्याला दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘उत्तर प्रदेशातील पूर्वांचल हे सुरुवातीला दुर्लक्षित होते. काँग्रेस सरकारच्या काळात पूर्वांचलची जनता अशा सुविधा मिळण्याचा विचारही करीत नव्हती. कारण वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांमध्येच लोकांना अडकवून ठेवण्यात आले होते. पूर्वांचलमधून त्यांचे मुख्यमंत्री निवडून आले तेव्हाही हीच परिस्थिती होती. त्याकाळी फक्त नेत्यांची हेलिकॉप्टर पूर्वांचलमध्ये उतरायची, आज विकास जमिनीवर पोहोचला आहे’, या शब्दांत मोदी यांनी काँग्रेस राजवटीवर टीका केली.

Post Views: 15
Previous Post

जाधव कुटुंब पाकिस्तानात जपतेय मराठी संस्कृती, लोक म्हणतायेत, पेशावर ते तंजावर अवघा मुलुख आपला

Next Post

मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकून खून; आरोपीला अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकून खून; आरोपीला अटक

मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकून खून; आरोपीला अटक

ताज्या बातम्या

17 March 2026

March 17, 2026

मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची अवंती नगर गणेश नगर परिसरात पाहणी

March 17, 2026

खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांचा युवा पॅंथर सामाजिक संस्थेच्या वतीने गौरव

March 17, 2026

मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची अवंती नगर गणेश नगर परिसरात पाहणी

March 17, 2026

मंचाळ दांपत्याचा खून पुतण्यांनीच केल्याची दिली कबुली …

March 17, 2026

देसाईंनी आव्हाडांना चांगलेच झापले

March 17, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 17, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0742528

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697