पंढरपूर – तालुक्यातील सहकार शिरोमणी सहयोग ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि, कारखान्याचेवतीने मागील गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दिपावली सणानिमित्त् मोफत साखर वाटपाचा शुभारंभ जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे यांचे हस्ते कारखाना साईट भाळवणी येथे करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना साळुंखे म्हणाले, ओंकार उद्योग समुहाचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे-पाटील व सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी एन दुष्काळ परिस्थितीत कारखान्याचे सभासद यांना सवलतीच्या दरात व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मोफत साखर वाटपाचे धोरण निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, दिपावलीचा सण आनंदाने साजरा करण्यास आर्थिक मदत होणार आहे. हिंदु धर्मातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिपावली सणामध्ये दृष्काळ पडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, मोफत साखर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होवुन, त्यांना आर्थिक आधार मिळाला असल्याचे सांगुन, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सर्व ऊस उत्पादक सभासद, अनामतदार शेतकऱ्यांना घरपोच साखर कुपन वाटप करण्यात आले असून, कारखान्याचे सभासद, भाग अनामतदार यांना प्रत्येकी ५० किलो साखर प्र.किलो रु.२७ /- सवलतीच्या दरात कारखाना साईटवर व वाखरी येथील एमआयटी समोरील साखर विक्री केंद्रातुन दि. ०२-११-२०२६ ते २०-११-२०२६ या कालावधीत सकाळी ९.३० ते सायं.५.०० पर्यत करण्यात येत आहे.
——————–
चौकट :- ( गटवाईज मोफत साखर वाटपाचे नियोजन )
मागील गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्यास गळीतास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खालील धोरणाप्रमाणे कारखाना साईटवरुन गटवाईज मोफत साखर वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ ते ३० मे.टनास प्रत्येकी १० किलो, ३१ ते ५० मे.टनास प्रत्येकी २० किलो, ५१ ते १०० मे.टनास प्रत्येकी ३० किलो, १०१ ते १५० मे.टनास प्रत्येकी ४० किलो, १५१ ते २०० मे.टनास प्रत्येकी ५० किलो, २०१ ते ३०० मे.टनास प्रत्येकी ७० किलो व ३०० मे.टनापेक्षा जास्त् ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना १०० किलो साखर मोफत वाटप करण्यात येत आहे. नोव्हेंबर, २ ते ३ तारखेपर्यत भाळवणी व वाखरी गट, ४ ते ५ तारखेपर्यत कासेगांव, करकंबगट व ६ ते ७ तारखेपर्यत तुंगत, सांगोला, माळशिरस, माढा, मंगळवेढा, मोहोळ व इतर गट याप्रमाणे गटवाईज कुपन धारकांनी साखर कारखाना साईटवरील साखर वाटप केंद्रातुन कुपन व ओळखपत्र दाखवुन मोफतची साखर घेण्यात यावी.
Post Views: 21