Sunday, October 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जनतेत विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता – भुजबळ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 11, 2024
in maharashtra
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जनतेत विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता – भुजबळ
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागली आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. यापुढील काळात आपल्या रस्त्यातील दगड धोंडे बाजूला सारून पुन्हा ठेच लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत जो समाज आपल्यापासून दुरावला गेला आहे त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आपल्याला कृतीतून दाखवावे लागतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत षण्मुखानंद सभागृह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल भाईदास पाटील, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अदिती तटकरे, मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, सर्व विधिमंडळ सदस्य,माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मुंबई शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव नलावडे, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, बाबा सिद्दीकी,मुश्ताक अंतुले,नरेंद्र राणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे सर्वच जाती घटकातील लोकांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. ज्या विचारांवर आपण काम करत आहोत ते विचार प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दाखवून द्यावे लागतील त्यातून राज्यातील सर्व घटकांच्या मनात आगामी काळात आपल्याला विश्वास निर्माण करावा लागेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत घटना बदलली जाईल असा अपप्रचार झाल्याने दलित, मुस्लिम,आदिवासी यासह अल्पसंख्यांक, भटके विमुक्त समाज हा महायुती पासून काही अंशी दूर गेला. त्याचा फटका आपल्याला बसल्याचे चित्र आपल्याला बघावयास मिळाले. आगामी काळात हे चित्र आपल्याला बदलावे लागणार आहे. त्यासाठी दलित मुस्लिम आदिवासी भटके विमुक्त अल्पसंख्यांक अशा सर्व समाजाला आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला संधी द्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की महायुती सरकारने मुंबईसारख्या शहरांमध्ये हजारो कोटी रुपयांची कामे केली आणि अनेक कामे सुरू असून देखील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईमध्ये मोठा फटका बसला आहे, याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच कोण आपल्यापासून दुरावला गेला आहे याचं आत्मचिंतन होण्याची आवश्यकता असून नेमका आजार काय झाला आहे त्यावर औषध शोधलं तर यश आपल्याला नक्कीच असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण महायुती सरकारने दिले आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे. तरी देखील काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जात आहे. त्यांना समजून सांगण्याची आवश्यकता असून राज्यातील सर्व समाज हा एकसंघ असून उगाच ओबीसी मराठा असा वाद निर्माण होणार नाही याची दक्षता देखील घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. येणाऱ्या निवडणुकीत सर्व समाजातील उमेदवारांना संधी देण्यात यावी. त्यासाठी जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवायला हवा असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीराव नलावडे हे या निवडणुकीत उभे आहेत. सर्व शिक्षक बांधवांनी भरघोस मतदान करून त्यांना विजयी करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले

मुंबईतून सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू – मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई शहर व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जाळ अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई शहराचा देखील मोठा वाटा असणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागाप्रमाणे मुंबई शहरातून देखील जास्तीत जास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाव्यात. आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post Views: 55
Previous Post

गोंदियातील प्रॉपर्टी व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक

Next Post

सोलापूर ‘शहर मध्य’ वर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा ; कार्याध्यक्ष जुबेर बागवान भेटले अजित पवारांना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर ‘शहर मध्य’ वर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा ; कार्याध्यक्ष जुबेर बागवान भेटले अजित पवारांना

सोलापूर 'शहर मध्य' वर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा ; कार्याध्यक्ष जुबेर बागवान भेटले अजित पवारांना

ताज्या बातम्या

पदस्थापनेचा निर्णय संबंधित विभागप्रमुख व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा !

October 9, 2026

चनबसप्पा खेडगी यांच्या सारखे विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे

October 9, 2026

सकाळी उठल्यावर आई-वडिलांचा पाया पडून आशीर्वाद घ्या

October 9, 2026
जागतिक टपाल दिवस साजरा

जागतिक टपाल दिवस साजरा

October 9, 2026

नेहरू वसतिगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिटचे बट्ट्याबोळ !

October 9, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेत महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय!

धाराशिव जिल्हा परिषदेत महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय!

October 9, 2026
वृत्तपत्र विक्रेत्यांचा एल्गार! कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी बार्शीत तहसीलदारांना निवेदन

वृत्तपत्र विक्रेत्यांचा एल्गार! कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी बार्शीत तहसीलदारांना निवेदन

October 9, 2026
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी शाळा व वसतिगृहे सुरू करा

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी शाळा व वसतिगृहे सुरू करा

October 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1335547

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!