नवी दिल्ली, 24 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आणिबाणीशिवाय बोलण्यासारखे दुसरे काहीच नसल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. अठराव्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनाला आज, सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खर्गे बोलत होते.
लोकसभेच्या विशेष अधिवेशनाला आज, सोमवारी प्रारंभ झाला. राष्ट्रपतींनी हंगामी अध्यक्ष भार्तृहरि महताब यांना शपथ दिल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या 280 खासदारांना शपथ दिली. तर उर्वरित 264 खासदार उद्या, मंगळवारी शपथ घेणार आहेत. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून इंडि आघाडीचे खासदार नाराज आहेत. याप्रसंगी पतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उद्या, मंगळवारी 25 जून आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी याच दिवशी संविधानावर काळा डाग लागला होता. अशी काळ देशात कधीही येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्यांची भारतातील लोकशाही परंपरांवर निष्ठा आहे. त्यांच्यासाठी 25 जून हा दिवस अविस्मरणीय आहे. राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवी पिढी कधीही विसरणार नाही. भारताचे तुरुंगात रूपांतर झाले. लोकशाही पूर्णपणे दाबली गेली. आणीबाणीची ही 50 वर्षे ही प्रतिज्ञा आहे की आपण आपल्या राज्यघटनेचे रक्षण करू आणि भारताच्या लोकशाही परंपरांचे रक्षण करू, तर देशवासीय संकल्प करतील की भारतात पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत कोणीही करणार नाही असे मोदींनी सांगितले.
मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान किती दिवस हेच बोलत राहतील, कुणास ठाऊक. त्यांच्याकडे आणीबाणीशिवाय बोलायला काहीच नाही. जे होते, ते घोषित केले होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, ती अनसेड इमर्जन्सी (अघोषित आणीबाणी) आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात जनता आमच्यासोबत आहे, पण मोदीजींनी संविधान तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज येथे आंदोलन करत आहोत.प्रत्येक लोकशाही नियम मोडला जात आहे, म्हणूनच आज आम्ही मोदीजींना संविधानाचे पालन करण्यास सांगत असल्याचे खर्गे म्हणालेत.























