‘विंडो सिस्टिमवर ब्ल्यू स्क्रीन एरर’मुळे सर्व्हर डाऊन नवी दिल्ली, 19 जुलै (हिं.स.) : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भारतासह जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. जगभरामध्ये विंडो सिस्टिमवर ब्ल्यू स्क्रिनचा एरर दिसत आहे.
याबाबत कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बहुतांश विंडोड युझर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर दिसत आहे. ही अडचण
हल्लीच्या क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे. या अडचणीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. दरम्यान, या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे. मुंबई विमानतळ आणि गोवा विमातळावर सर्व्ह ठप्प झाली होती. तसेच मुंबई विमानतळावर चेक इन सिस्टिम ठप्प झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
अनेकांना हातानी लिहीलेले बोर्डिंग पास घेऊन प्रवास करावा लागला. आकासा एअरने सेवा ठप्प झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्पाइस-जेट आणि इंडिगेकडूनही अशी तांत्रिक अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म क्राऊडस्ट्राइकमध्ये निर्माण झालेल्या
अडचणींमुळे सेवा बाधित झाल्या आहे. या अडचणीमुळे लाखो युझर्सना फटका बसला आहे. अनेक युझर्स त्यांच्याकडे सिस्टिम शटडाऊन झाल्याची किंवा त्यांना ब्लू स्क्रीनची अडचण येत असल्याची तक्रार करत आहे. याचा फटका मुख्य बँका, इंटरनॅशनल
एअरलाइन्स, जीमेल, ऍमेझॉन आणि इतर अत्यावश्यक सेवांना फटका बसला आहे. भारतासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्येही बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आऊटलेट आणि एअरलाइन्सची सेवा प्रभावित झाली आहे.