मुदखेड ता प्र
मुदखेड तहसील कार्यालयात महसूल पंधरवडा निमित्ताने दि.१० ऑगस्ट रोजी तहसीलच्या सभागृहात सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना. सेवा, त्याग, बलिदान,समर्पित भावनेने मातृभूमी साठी प्राणाची बाजी लावून देशसेवा करून आलात आशा व्यक्तिमत्त्व साठी शहरी व ग्रामीण भागातील आपल्या जीवनात उर्वरित काही अडचणी व समस्यांना, महसूल प्रशासनाच्या वतीने मी असे पर्यंत प्राधान्याने सोडवनार असुन माझ्या कार्यालयात आपण आपली कामे घेऊन सन्मानाने या असे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी बोलताना म्हणाले .
महसूल पंधरवडा निमित्ताने तालुक्यातील माजी सैनिकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, यांनी माजी सैनिकांच्या विविध समस्या विस्ताराने मांडल्या, यानंतर बि .जी.कळणे , पत्रकार प्रल्हाद मस्के यांनी मनोगत व्यक्त केले.
संघटक प्रभु घोंगडे तालुका अध्यक्ष मारोती गुंठे मार्गदर्शक राजाराम हळदे, माधव पवार, सुनील चौदंते, हयुम पठाण मंडळ अधिकारी, चंद्रकांत तेलंग, शशिकांत मोडवान, विकास बल्फेवाड, , देवराज चौदंते,देविदास पवार, संजय चव्हाण, बालाजी गव्हाणे, संजय देवदे, साहेबराव वने, साईनाथ राठोड, शेख फारुख, शेख चाँद, यांचा तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी हायुम पठाण, यांनी केले तर आभार प्रदर्शन तलाठी गोपाळ माने यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी हयुम पठाण, विकास गलांडे, विश्वनाथ बोधमवाड, बी. जी. कळणे, बालाजी बोडके, औसेकर मावशी सेविका, व महसूल कर्मचार्यांनी परिश्रम घेतला होता.