Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतीला सौर ऊर्जा, शेतकऱ्यांमध्ये चैतन्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 13, 2024
in top news
0
शेतीला सौर ऊर्जा, शेतकऱ्यांमध्ये चैतन्य
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशातील ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 22 टक्के वापर होतो. महाराष्ट्रात सुमारे 45 लाख कृषी वीज ग्राहक असून ते वीजेचा वापर हा मुख्यत: कृषी पंपासाठी करतात. शेतकऱ्यांना पूर्वी चक्रीय पद्धतीने दिवसा आणि रात्री वीजपुरवठा केला जात होता. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात सिंचन करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत असे. यावर उपाय म्हणून शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ 14 जून 2017 साली सुरू केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी या योजनेत आवश्कतेनुरूप बदलही करण्यात आले. तथापि, या योजनेच्या अंमलबजावणीचा अनुभव व आव्हाने पाहता या योजनेची अंमलबजावणी मिशन मोडवर करण्याची आवश्यकता निर्माण झाली.

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’चे सुधारित स्वरूप निश्चित करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण व महापारेषण कंपनी, महाऊर्जा तसेच पीडब्ल्यूसी संस्था यांच्या प्रतिनिधींचा एक अभ्यासगट प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला. या अभ्यासगटाने विविध शिफारसी आणि मिशन 2025 संदर्भात प्रयास संस्थेचा अहवाल विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीपंपाना दिवसा वीज पुरवठा करण्यसाठी तसेच कृषी फिडर्सचे सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये करण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

या अभियानामध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अधिक सक्षम आणि सुव्यवस्थित करणे, सन 2025 पर्यंत कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक कार्यपद्धती आणि देखरेखीचा आराखडा तयार करणे आणि शेतकऱ्यांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा करणे आणि किमान 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणे, ही उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली.

या अभियानांतर्गत विकेंद्रित प्रकल्प आस्थापित करण्यासाठी वीज उपकेंद्रांच्या परिघातील जमिनीची उपलब्धता, ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि प्रकल्पाचे आकारमान हे महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक परिस्थितीनुरूप बदलत असतात. यासाठी काही तरतुदींचा अवलंब करण्यात आला. जसे 0.5 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करून ते 11 केव्ही/22 केव्ही स्तरावर जोडणे, 5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करून ते 33 केव्ही स्तरावर जोडणे, ग्रीड कनेक्टीव्हिटी उपलब्ध असल्यास उजनी, जायकवाडी व इतर जलाशयांवर व्यवहार्यतेच्या अधीन राहून 10 ते 50 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प 11 केव्ही / 22 केव्ही / 33 केव्ही स्तरावर जोडणे, प्रकल्प समूह तयार करणे अशा विविध तरतुदींचा अवलंब करण्यात आला.

या अभियानासाठी पडीक जमिनीची आवश्यकता असल्याने ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी वीज उपकेंद्रापासून जवळच्या परिघातील खाजगी जागा निश्चित करून सौर ऊर्जा प्रकल्पास उभारण्यास द्यावी, असे ठरविण्यात आले. यासाठी प्रकल्पासाठी शासकीय जमिनी नाममात्र रूपये एक या दराने 30 वर्षाच्या कालावधीकरिता भाडेपट्याने आणि पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत खाजगी जमीन भाडेपट्ट्यावर घेताना त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या 6 टक्के दरानुसार परिगणीत केलेला दर किंवा प्रतिवर्ष 1 लाख 25 हजार रूपये प्रती हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम पायाभूत वार्षिक भाडेपट्टा दर म्हणून गृहीत धरण्यात आला. अशा प्रकारे प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टा दरावर प्रत्येक वर्षी 3 टक्के सरळ पद्धतीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत प्रकल्पाची क्षमता कमी असल्यामुळे प्रकल्प आस्थापनेचा खर्च वाढतो व प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता कमी असते. तरीही कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याची गरज लक्षात घेता अशा प्रकल्पांना चालना देण्यासाठी विकासकांना प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य देण्याचे ठरले. तसेच या अभियानात भाग घेणाऱ्या विकासकांना नाबार्ड, इरेडा, सार्वजनिक बँकाकडून माफक दराने प्रकल्प निधी मिळण्यासाठी शासनाने आवश्यक ती मदत केली.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान असल्याने नोडल एजन्सी, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, स्वतंत्र यंत्रणा, महाऊर्जा, प्रकल्प विकासक, स्थानिक प्रशासन, शेतकरी यांचे एकत्रित प्रयत्न झाले. यासाठी उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. अभियानाची यशस्वी व जलदगतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली.

या अभियानाचा फायदे पाहता, या अभियानामुळे औद्योगिक व व्यावसायिक वीज ग्राहकांवर आकारण्यात येणारी क्रॉस सबसिडी कमी होऊन औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांच्या वीज दरात कपात, राज्याच्या विविध जिल्ह्यात मोठी गुंतवणूक आणि ग्रामीण भागात पूर्णवेळ आणि अर्धवेळ रोजगार निर्मिती होत आहे. महावितरण व महापारेषण कंपनीची वितरण प्रणाली सुद्धा बळकट झाली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना योग्य त्या भाराने वीज पुरवठा होण्यास मदत झाली. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडेपट्ट्याने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना 25 वर्षाच्या कालावधीकरिता शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आणि राहणीमानाचा दर्जा व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली. त्याचबरोबर सामाजिक फायदा सुद्धा झाला आहे.

– संजय डी.ओरके

विभागीय संपर्क अधिकारी (ऊर्जा)

Post Views: 46
Previous Post

बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने ते बोललो – रवी राणा

Next Post

सहशिक्षिका अनिता तुकाराम दाणे जुंबाड सेट परीक्षा उतीर्ण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सहशिक्षिका अनिता तुकाराम दाणे जुंबाड सेट परीक्षा उतीर्ण

सहशिक्षिका अनिता तुकाराम दाणे जुंबाड सेट परीक्षा उतीर्ण

ताज्या बातम्या

गौरी पूजनासह महानैवेद्याचा थाट; घराघरांत भक्तिमय वातावरण #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 18, 2026

कंदलगावात दोन घरांवर दरोडा; सहा लाख दहा हजारांचा ऐवज लंपास #viral #news #marathinews #solapurnews

September 18, 2026

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना फटका #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी २४० कोटींचा निधी #viral #solapurnews #marathinews

September 18, 2026

पालकमंत्री घेणार सोमवारी पाणीटंचाईचा आढावा #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

संभाजी ब्रिगेडचा जिल्हा परिषदेत राडा…. #viral #solapurnews #news

September 18, 2026

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील शिक्के गेले चोरीला नगरसेविका श्रद्धा पवारांनी वेधले लक्ष

September 18, 2026

मोदींना शुभेच्छा देण्यामागे राजकीय हेतू नाही सलगर #viral #solapurnews #news

September 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1231530

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!