Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी अलायन्स एअर कंपनीच्या “फेअर से फुरसत” या निश्चित विमानप्रवास भाडे योजनेची सुरुवात

तरुण भारतbyतरुण भारत
October 14, 2025
in india
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी भारत सरकारच्या मालकीच्या अलायन्स एअर या प्रादेशिक कंपनीच्या “फेअर से फुरसत” या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन केले. सतत बदलत राहणाऱ्या विमानप्रवास भाड्याच्या चिंतेपासून प्रवाशांना मुक्तता मिळवून देणे आणि देशातील हवाई वाहतुकीतील सुलभता वाढवणे हा या फेअर से फुरसत उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत, अलायन्स एअर ही कंपनी, बुकिंगची तारीख लक्षात न घेता अगदी उड्डाणाच्या दिवशी देखील सारखेच निश्चित भाडे आकारणार आहे. या नव्या सुविधेची  परिचालनात्मक व्यवहार्यता आणि प्रवाशांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी 13 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत निवडक मार्गांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री म्हणाले, ““फेअर से फुरसत” ही योजना उडान योजनेच्या मुख्य तत्वांशी उत्तम प्रकारे जुळणारी आहे. हवाई वाहतूक क्षेत्राचे लोकशाहीकरण करुन विमानप्रवासाचा खर्च मध्यम वर्ग, निम्न-मध्यम वर्ग तसेच नव-मध्यम वर्ग यांना परवडेल असा स्वरूपाचा करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आज, अलायन्स  एअर ही कंपनी पुढे नेत आहे.” स्थिर विमानभाडे प्रणाली, सतत बदलत्या विमानप्रवास भाड्याशी संबंधित अनिश्चितता तसेच तणाव दूर करते आणि अगदी शेवटच्या क्षणी देखील बुकिंग साठी खर्चाचा अंदाज लावता येईल अशी ठेवते.

या प्रादेशिक विमान सेवेचे योगदानावर अधिक भर देत केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी अलायन्स  एअर या कंपनीला सरकारच्या उडान या प्रादेशिक संपर्क योजनेचा कणा असे संबोधले आहे. ही विमानसेवा दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील शहरांना राष्ट्रीय हवाई वाहतूक जाळ्याशी जोडते. “अलायन्स  एअर कंपनीने एक मार्ग, एक विमानप्रवास भाडे या संकल्पनेसह एक धाडसी तसेच अनुकरणीय पाऊल उचलले आहे. ही खरोखरीच ‘नये भारत की उडान’ असून यात नफ्याच्या पलीकडे जाऊन विचार करत सार्वजनिक सेवांवर लक्ष केंद्रित करणारी सुविधा आहे,असे ते म्हणाले.”

भारतातील हवाई उड्डाण विषयक बाजारपेठ मुख्यत्वे करून गतिशील किमतीच्या नमुन्यानुसार चालते आणि त्यात मागणी, ऋतुमान आणि स्पर्धात्मकता यांच्या नुसार वास्तव वेळी तिकिटांचे दर बदलत राहतात. महसूल व्यवस्थापनासाठी हे परिणामकारक असले तरीही त्यातून बहुतेकदा शेवटच्या क्षणी अप्रत्याशित दरांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. विमान प्रवासाच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि स्थैर्य आणून या दीर्घकाळ प्रलंबित आव्हानावर उपाय शोधणे हे या “फेअर से फुरसत” या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्या छोट्या शहरांतील लोकांना विमान प्रवासाचा पर्याय निवडण्यासाठी हा उपक्रम प्रोत्साहित करेल आणि त्यायोगे विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी सुलभ आणि परवडण्याजोगा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला बळकटी मिळेल.

अलायन्स एअर ही कंपनी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत हवाई संपर्क जोडणी सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी विमान प्रवास प्रत्यक्षात साकार करत ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेत योगदान देणे सुरु ठेवत आहे.

Post Views: 68
Previous Post

करकंब येथे जुगार अड्ड्यावर धाड, १४ आरोपी ताब्यात

Next Post

ईपीएफओने नवीन ईसीआर भरण्याची अंतिम मुदत 22 ऑक्टोबर पर्यंत वाढवली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ईपीएफओने नवीन ईसीआर भरण्याची अंतिम मुदत 22 ऑक्टोबर पर्यंत वाढवली

ताज्या बातम्या

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान.#india #france #public #viral

February 13, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १३ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.#public

February 13, 2026

सोलापूर महानगरपालिका बनणार चकाचक डिजिटल.#public #marathinews #viral

February 13, 2026

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677940

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697