सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनी आयोजित एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले. सकाळी डीआरएम कार्यालय ते सोलापूर रेल्वे स्थानकापर्यंत “रन फॉर युनिटी” आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात विभागीय क्रीडा संघटनेचे सदस्य, भारत स्काउट्स अँड गाईड्सचे स्वयंसेवक, आरपीएफ आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभाग दिसून आला.
सोलापूरचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार यांनी या रन फॉर युनिटी ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकता आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश पसरविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तदनंतर, सकाळी ११:०० वाजता, डीआरएम कार्यालयात राष्ट्रीय एकता दिनाचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला. एडीआरएम अंशुमाली कुमार यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ” दिली. तसेच राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. सोलापूर रेल्वे विभागातील सर्व विभाग आणि स्थानकांमधील कर्मचाऱ्यांनीही आपापल्या कामाच्या ठिकाणी एकाच वेळी शपथविधी समारंभात भाग घेतला आणि राष्ट्रीय एकात्मता आणि सौहार्दाचे आदर्शांप्रती सामूहिक समर्पण दाखवले.
असे कार्यक्रम मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या एकता आणि राष्ट्रनिर्माणाच्या जोपासना प्रती असलेल्या अढळ वचनबद्ध तेवर प्रकाश टाकतात.





















