अक्कलकोट – वारकरी संप्रदाय हे सर्व जातीपातींना समान वागणूक देणारा असून या माध्यमातून संजय पाटील महाराज यांनी नागरिकांना कीर्तनातून तत्वज्ञानासह जगण्याची प्रेरणा दिली असल्याची प्रतिपादन सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.
संजय पाटील महाराज यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील काशिलिंग यात्रेत वारकरी सेवाभूषण परिवार व ग्रामस्थांकडून गौरव सोहळा आयोजित केले होते.यावेळी सुधाकर महाराज इंगळे बोलत होते. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प. पू .पांडुरंग महाराज यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी काशिलिंग देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी – कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील होते.
यावेळी सुधाकर महाराज बोलताना म्हणाले की, संजय महाराज पाटील हे अक्कलकोट पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत असूनही ते परमार्थ करतात. ते दिवसभर नोकरी करून रात्री जिल्ह्यासह राज्यात कीर्तनाच्या जनजागृती प्रपंचातून विविध ठिकाणी माध्यमातून करतात. त्यांनी परमार्थ कसा घडवायचा, याचा संदेश दिल्याने त्यांना वारकरी सेवाभूषण पुरस्कार मिळाला आहे. यावेळी ग्रामदैवत काशिलिंग देवस्थान कमिटीकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास वसंत पाटील, सुरेश सोनार, रमेश गोगांव, महेश पाटील, प्रदीप पाटील आदी सह बहुसंख्य जण उपस्थित होते.
















