Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

59 रस्त्यांसाठी 140 कोटी रूपयांचा निधी आणला; मर्जीतल्या गुत्तेदारासाठी भाजपा आग्रही

तरुण भारतbyतरुण भारत
November 1, 2025
in maharashtra
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून शहरातील 59 रस्ते व इतर कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार्‍या मंडळींनी मंत्री महोदयांचे आभार मानायला पाहिजे होते. परंतु रस्त्याचे काम मर्जीतल्या लाडक्या गुत्तेदाराला 15 टक्के जादा दराने देण्याचा घाट भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केला आहे.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी 140 कोटी रुपयांच्या ठेकेदारीवरून सुरू असलेल्या रस्ता कामांचा समाचार घेतला. यावेळी शिवसेनेचे संघटक सुधीर पाटील, शहरप्रमुख आकाश कोकाटे, डी. एन. कोळी उपस्थित होते.

रस्ताकामासाठी मंजूर झालेल्या 140 कोटी रूपयांच्या निधीबाबत मध्यंतरी स्थगिती देण्याचे कारण यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी स्पष्ट केले. हा निधी कोणी मंजूर केला आणि कोणी मंजूर करवून आणला याबाबत  ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट करणार्‍यानी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे, तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि निधीचा दुरूपयोग करणार्यावर नियमाचा बडगा उगारणारे विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचे आभार मानायचे सोडून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट सुरू केला असल्याचा घणाघात त्यांनी केला. त्याचबरोबर या कामाच्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेवून याबाबत निवेदन देवून चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनीही या कामात लक्ष घातले असून त्यांचेही समर्थन आपणास मिळाले असल्याचेही साळुंके यांनी सांगितले.

140 कोटी रूपयांच्या कामात मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि लाडका गुत्तेदार यांची मुंबई येथे  बैठक कुठे झाली? आणि त्यांच्यामध्ये  रोख दोन ( 2 ) कोटी रूपयांची ‘डील’ झाली याचीही माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये असेही यावेळी साळुंके यांनी स्पष्ट केले.

धाराशिव शहरातील नागरिकांची रस्त्यांची गैरसोय लक्षात घेवून विविध भागातील 59 रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री भाई एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे सतत  पाठपुरावा केला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे यांनी तब्बल 140 कोटी रूपयांचा निधी धाराशिव नगर परिषदेकरिता मंजूर केला. तेव्हा जनतेचे तारणहार म्हणून मिरवणार्या तुळजापूरच्या भाजप आमदाराने धाराशिव शहरातील चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावून निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा घणाघात सुरज साळुंके यांनी केला.

धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची काही कामे यापूर्वीच झालेली आहेत. तरी देखील त्याच रस्त्याच्या कामाचे टेंडर पुन्हा काढण्याचे कारण काय? असा सवाल करीत निधीचा दुरूपयोग करण्याचे पाप नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि भाजपा, उबाठा गटाचे लोक करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळे शहराचा सत्यानाश केला, आगामी निवडणूक समोर ठेवून सुरू असलेला हा खेळ जनता ओळखून आहे. त्यामुळे असे राजकारण चालणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


लवकरात लवकर फेरनिविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार

धाराशिव शहरात सध्या चालू असलेल्या राजकारणावर पडदा पाडून शहराचा विकास करण्यासाठी नेहमीच शिवसेना कटिबद्ध असते त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आम्ही फेरनिविदा काढून लवकरच शहरवासीयांना होणार्‍या त्रासापासून मुक्त करू, असेही सुरज साळुंके यांनी सांगितले. परिषदेत टिका

Post Views: 38
Previous Post

कॉरिडॉर सक्तीची धमकी चुकीची : तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर

Next Post

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज : मुख्याधिकारी  महेश रोकडे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज : मुख्याधिकारी  महेश रोकडे

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1014196

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!