Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अचकदानी तलावा जवळ पक्षी निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करा, पक्षी व वन्यजीव प्रेमी कडून मागणी 

तरुण भारतbyतरुण भारत
November 2, 2025
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – अचकदानी (ता.सांगोला) या गावाला तेथील निसर्ग संपन्नता, पक्षी वैभव, तलाव परिसर व तेथील निरव शांतता यामुळे विशिष्ट ओळख प्राप्त आहे. अचकदानी वनविभाग परिक्षेत्रातील वनराईने समृद्ध रोपवाटिका व जलसंधारणातून समृद्ध असा जलाशय विविध स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांना आकर्षित करीत असतो. म्हणून येथे तलावाच्या जवळ पक्षी निरीक्षणासाठी महाराष्ट्र शासन व वन विभागाकडून निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करण्यात यावी अशी मागणी पक्षी व वन्यजीव प्रेमी कडून होत आहे.

सांगोल्यातील पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे व प्रा.डॉ.विधीन कांबळे हे पक्षी निरीक्षणासाठी अचकदानी येथे गेले असता त्यांना स्वर्गीय नर्तक या पक्षाच्या नर व मादीचे दर्शन झाले. प्रौढ नराचा रंग पांढरा असून डोके व त्याच्यावरील तुरा काळा व चमकणारी निळसर छटा असणारा असतो. प्रौढ नराची लांबी ही २० ते ३० सेंटिमीटर इतकी असते. अप्रौढ नराचा रंग तांबूस-तपकिरी असतो व त्याच रंगाची लांब शेपूट असते. मादी तांबूस तपकिरी असून शेपूट आखूड असते. डोक्यावरील तुरा लहान असतो. हे पक्षी गर्द झाडीचे ठिकाण, जलाशय, ओढे, तलाव, यांच्याजवळ दिसून येतात. कीटक भक्षी असणाऱ्या या पक्षांचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या पूर्वार्धात सुरू होतो. हा पक्षी भारताच्या नैऋत्येकडील प्रदेशात स्थानिक व इतर भागात स्थलांतरित आहे. अचकदाणी परिसरात स्वर्गीय नर्तक आढळल्याने निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. म्हणून याठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करण्याची मागणी होत आहे.

स्वर्गीय नर्तक या पक्षाला त्याच्या नराच्या शुभ्र पांढऱ्या रंगामुळे दुधराज असेही संबोधले जाते. हा पक्षी मध्य प्रदेश या राज्याचा राज्यपक्षी आहे. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या नराची लांब सडक पांढरी शेपूट. हा पक्षी हवेत उडत असताना या लांब सडक शेपटीच्या हवेत उडणाऱ्या रिबिनी प्रमाणे दिसणाऱ्या विशिष्ट हालचालींमुळे याला स्वर्गीय नर्तक हे नाव प्राप्त झाले आहे. स्वर्गीय नर्तक या पक्षाची सांगोला तालुक्यातील ही प्रथमच नोंद आहे. यापूर्वी इथे स्थलांतरित लाल सरी बदकेची शेकडोच्या संख्येने थव्याची नोंद २०२३ मध्ये केली आहे. या स्थलांतरित पक्ष्याच्या आढळण्यामुळे अचकदानीच्या पक्षी वैभवात भर पडली आहे. 

– प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, पक्षी अभ्यासक, सांगोला

पक्ष्यांना निसर्गातील हवामान बदलाचे जन्मजात ज्ञान असते. सध्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन होणाऱ्या हवामान बदलामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावरही परिणाम होत असल्याचे जाणवत आहे. स्वर्गीय नर्तक या पक्ष्याला आययूसीएन रेड लिस्टमध्ये सर्वात कमी चिंताजनक म्हणून सूचीबद्ध केले आहे. अधिवासाचा नाश, विखंडन आणि ऱ्हास, तसेच हवामान बदल हे प्रमुख घटक या पक्षांच्या अस्तित्वासाठी संभाव्य धोके आहेत.

– प्रा.डॉ.विधीन कांबळे, पक्षी अभ्यासक, सांगोला

Post Views: 21
Previous Post

दयानंद बिडवे भारतीय जनता पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते  : आ. कल्याणशेट्टी

Next Post

महापालिकेच्या बस स्टॉपमध्ये पडलेले भगदाड बुजविले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापालिकेच्या बस स्टॉपमध्ये पडलेले भगदाड बुजविले

ताज्या बातम्या

सपकाळ सारख्या प्रवृत्तीवर सरकार अंकुश लावेल.#public #viral #breakingnews #एकनाथशिंदेसाहेब

February 16, 2026

पानगाव मध्ये अफूच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस..#viral #public #marathinews #solapurnews

February 16, 2026

कळंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी.#vairal #पब्लिक

February 16, 2026

ढासला येथे संजय गांधी निराधार योजनेत मोठा घोटाळा.#public #solapurnews

February 16, 2026

आव्हाना येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न.#public

February 16, 2026

करकंब मध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी.#viral

February 16, 2026

विविध प्रलंबित मागण्यासाठी लिपिक वर्गीय संघटनेने केले कामकाज बंद आंदोलन.#viral #public #solapurnews

February 16, 2026

महाराष्ट्राचा शिवकालीन मर्दानी खेळ जगभरात पोहोचवण्यासाठी सोलापूरची रणरागिणी सज्ज.#viral #शिवजयंती

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683164

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697