Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शरद पवारांचे राष्ट्रवादी कार्यालय निघाले विक्रीला ! राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण

तरुण भारतbyतरुण भारत
November 4, 2025
in political
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद ऊफाळून येत असल्याचे चित्र आहे. या वादातूनच आता नवीन घडामोड समोर येत आहे. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शरद पवार यांच्या बैठकीस अनुपस्थिती लावण्याने त्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी शहर कार्यालय रिकामे करणयास सांगितल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेतून ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे महापौर बंगला रेल्वे लाईन येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय तात्पुरत्या काळासाठी कालिका मंदिर येथील एका गळ्यात स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसे पत्र देखील शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी काढले आहे. या नव्या घडामोडीं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील अंतर्गत वादासाठी कारणीभूत ठरत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे. 

          दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीस सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधीर खराटमल यांनी स्वतः न जाता आपल्या कार्यकर्त्याला पाठवले. दस्तुरखुद शरद पवार यांच्या बैठकीला अध्यक्षांनी दांडी मारल्याने तसेच पूर्वाश्रमीच्या भाजपच्या कट्टर समर्थक असणाऱ्या महेश गाडेकर यांना आपला जवळचा कार्यकर्ता म्हणून बैठकीला पाठवल्याने राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना राग आला. यामुळे राष्ट्रवादीचे शहरातील राजकारण चांगलेच तापले. याराजकारणावरून शहरा राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष विरुद्ध कार्यकर्ता असा कलगीतुरा पहावयास मिळाला.

       या घटनेनंतर शरद पवार यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन या गोष्टीचा जाब विचारला. त्यानंतर खरटमल यांनी खुलासा करताना पक्षाने केव्हा पण बैठक घ्यावी. आणि आम्ही उपस्थित रहावे. त्यासाठी मी रिकामा नाही. त्याचवेळी गॅस एजन्सी कंपनीची बैठक होती. त्यामुळे महेश गाडेकर यांना मुंबई येथे पाठविले. महेश गाडेकर हा माझाच कार्यकर्ता असल्याचे सांगितले. मात्र पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला इतर पक्षातून राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्याला पाठवणे योग्य आहे का ? असा सवाल पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याने राजकारण ढवळून निघत आहे. याच कारणातून हा प्रकार घडला असल्याचा कयास आता लावला जात आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

 

ती जागा माझी नाहीच.

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय असलेली जागा पक्षाची नाही. ती जागा आमच्या मेव्हण्याची होती. त्यांच्या घरगुती अंतर्गत वादामुळे मेव्हण्याने जागेचा ताबा माझ्या नावाने केला होता. त्यामुळे जागा भाडे तत्वावर वापरली जात होती. परंतु जेव्हा मी पदावरून उतार झालो. तेव्हा त्यांना जागा परत केली. तेव्हा खरटमल यांनी जागेचे भाडे देण्याचे मान्य केल्याने, सदरची जागा पुन्हा पक्ष कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र माझ्या परस्पर आमचे मेहुणे अशोक गायकवाड आणि युवराज राठोड यांच्यात जागेचा व्यवहार झाला. त्यांनी ती जागा राठोड यांना विकल्याने अचानक बांधकाम राठोड यांनी सुरू केले. ही बाब लक्षात आल्यानंतर खरटमल यांना सांगण्यात आले. 

– भारत जाधव, प्रदेश उपाध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

तात्पुरत्या काळासाठी पक्ष कार्यालयाचे स्थलांतर 

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय भारत जाधव यांच्या नातेवाईकांच्या नावाने आहे. ही जागा त्यांनी विकल्याने तात्पुरत्या काळासाठी कार्यालयाचे स्थलांतर कालिकादेवी मंदिर जवळील एका गाळ्यात केले आहे. लवकरच पक्षाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्यात येईल. 

– सुधीर खरटमल, शहराध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

Post Views: 48
Previous Post

धुंडामहाराज देगलूरकर मठात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजन

Next Post

भिम प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांचे मुर्ती वापट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भिम प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांचे मुर्ती वापट

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1233933

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!