Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण करा

तरुण भारतbyतरुण भारत
November 5, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम दि. १० जानेवारी २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करावे.ठरविलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास टेंडरमधील अटी व शर्तींनुसार  मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल. प्रती दिन  १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच मक्तेदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये कायमस्वरूपी टाकण्यात येईल.कुठल्याच निविदा प्रक्रियेमध्ये त्यांना सहभाग घेता येणार नाही, अशी नोटीस महापालिका प्रशासनाने संबंधित मक्तेदाराला बजावली आहे.

           सोलापूर महानगरपालिकेच्या नावीन्यपूर्ण योजना सन २०२२-२३ अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम ठेकेदार सुरज दादासाहेब शिंदे (रा. दिघी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या नावे मंजूर करण्यात आले आहे. या कामाची वर्कऑर्डर दिनांक ४ मार्च २०२४ रोजी देण्यात आली असून, ठरविलेल्या अटींनुसार कामाची मुदत ६ महिने निश्चित करण्यात आली होती. तथापि, या कालावधीत काम समाधानकारकरीत्या पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले. दि. २९ मे २०२५ रोजी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत काम बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतरही काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे संबंधित ठेकेदारास नोटीस क्र.०१ व क्र.०२ देण्यात आल्या असून, काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश वारंवार देण्यात आले होते.

        दरम्यान, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी यांनी स्वतः  भेट देऊन पाहणी केली असता, कामाची गती अत्यंत मंद असल्याचे मत त्यांनी नोंदविले. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींकडूनही या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.या परिस्थितीचा विचार करता सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास तातडीने युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

           सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेवर आणि वेळेत पूर्णतेवर भर देत, नागरिकांना उत्तम दर्जाचे आणि आकर्षक सार्वजनिक ठिकाण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले आहे. 

संबंधित ठेकेदाराने तातडीने काम पूर्ण करणे आवश्यक : आयुक्त डॉ. ओम्बासे

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या संदर्भात सांगितले की, “श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम हे शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीशी निगडीत महत्त्वाचे आहे. या कामात होणारा विलंब नागरिकांना अस्वस्थ करणारा असून, संबंधित ठेकेदाराने तातडीने काम पूर्ण करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या वतीने कामाच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल.”

Post Views: 13
Previous Post

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा दाखल 

Next Post

सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवणपर्यंत विस्ताराला तर नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला हिरवा कंदील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवणपर्यंत विस्ताराला तर नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला हिरवा कंदील

ताज्या बातम्या

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांना डीआरएम सोलापूर पुरस्कार

February 15, 2026

डीएव्ही शैक्षणिक संकुल करकंब येथे महर्षी दयानंद जन्मोत्सव उत्साहात

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680921

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697