अक्कलकोट – दुपारी त्रिपुरारी पौर्णिमा व गुरुनानक जयंती असल्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरीता स्वामी भक्तांची मोठी गर्दी होणार असल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
त्रिपुरारी पोर्णिमा निमित्य हजारो भाविक तीर्थक्षेत्री दर्शनार्थ व पायी दिंडी सोहळा द्वारे दाखल झाले आहेत . स्वामी नाम गजराने अक्कलकोट नगरी दुमदुमुन गेली आहे भाविकांनी समर्थ नगरी फुलली आहे .
स्वामी भक्तांच्या या वाढत्या गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता त्रिपुरारी पौर्णिमेरोजी मंदीर पहाटे ३ वाजता उघडण्यात येईल. पहाटे ४ वाजता श्री स्वामी समर्थांची काकड आरती व दुपारी ११: ३० वाजता नैवेद्य आरती व रात्री ८ ते ८:४५ या वेळेत शेजारती या नित्यक्रम आरत्या संपन्न होतील. मंदिरात स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. स्वामी भक्तांनी अभिषेकाची पावती केल्यास प्रसाद मिळेल. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुणे, दौंड, मालेगांव, मसले चौधरी, बार्शी सोलापुर, कर्जत, भोर, खर्डी-पंढरपूर, कुमठा सोलापुर इत्यादी व अन्य ठिकाणांहुन दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणार आहेत.

यानिमीत्ताने वटवृक्ष मंदीरात परगावाहून येणाऱ्या दिंडी व पालखी सोहळयांची वारी विसावणार आहे. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.दिंड्यांसोबत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे, तरी परगावाहून दिंडी व पालखी सोबत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
दौंड येथुन सुमारे १५० स्वामी भक्त गेली ७दिवसा पेक्षा अधिक काळापासुन पायी दिंडी सोहळ्या द्वार स्वामी दर्शनार्थ दाखल झाले आहेत .
रहदारीच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे रिक्षा स्टॉप प्रवाशी चढउतार वाहने पार्किग यावर नियंत्रण आणुन भाविकाचा सुलभ मंदिर परिसरात वावर व्हावा याकरिता वाहतुक पोलीसानी योग्य ती दक्षत्र घ्यावी अशी भाविकांची मागणी आहे

















