मोहोळ – आगामी निवडणुकांमध्ये ७० टक्के तरुणांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे.त्याचबरोबर स्थानिक स्तरावर आघाडी जरी झाल्या तरी आपापल्या चिन्हावर सर्वजण लढणार आहेत आणि या सर्वांना आपण ताकद देऊन पाठिंबा द्यायची आहे .मला पक्षाने आदेश दिल्यामुळे जिल्हाभर मी आता दौरे करत असून आगामी निवडणुका आपल्याला सगळीकडे स्पष्ट बहुमत मिळवायचे आहे असे आदेश माढयाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले. आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षाचा मेळावा मोहोळ मध्ये पार पडला त्यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते .
यावेळी माजी आमदार रमेश कदम संजय क्षीरसागर एडवोकेट पवन गायकवाड,जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख ,महिला जिल्हाध्यक्ष शिवपुरे ताई, युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी,ओबीसी जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर, मोहोळचे माजी सरपंच अशोक देशमुख,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार रमेश कदम म्हणाले की नगराध्यक्ष पदाची ही जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे . यामुळेया कॅटेगरीमध्ये बसणाऱ्यांनाच ही जागा द्या . त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होणार नाही.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख म्हणाले,विजय दादा आणि पवार साहेब यांना मानणारे बहुसंख्य मतदार या मतदारसंघात आहे .कदम साहेबांना पंधरा दिवसात तर खरे साहेबांना दहा दिवसात निवडून दिले आहे.
मतदार पुरोगामी विचाराचा असून तो पवार साहेबांच्या पाठीशी आहे यामुळे आगामी निवडणुकीत आपले यश निश्चित आहे फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे .आगामी निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस शहर चंद्र पवार गटाचा झेंडा फडकवण्याचे काम आपण सर्वांनी निष्ठेने करावे असे आवाहनही त्यांनी केले .
प्रास्ताविक करताना पुन्हा एकदा तालुकाध्यक्षपदी निवड झालेले पंचायत समितीचे माजी सदस्य आणि नरखेड चे माजी सरपंच विनय कुमार पाटील म्हणाले की,”आगामी निवडणुकांमध्ये पवार साहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायचे आहे पदे येथील पदे जातील पवार साहेबांच्या विचारावर या तालुक्याचे निष्ठा आहे .पवार साहेबांच्या विचाराचा आमदार आपण निवडून दिला आहे त्याच पद्धतीने आगामी जि प पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये आता ताकदीने निवडणूक लढवायची आहे. पवार साहेबांच्यामुळे आपल्याला विजय निश्चित मिळणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळीॲड. इरफान पटेल, विलास पाटील, संभाजी मोटे, नवनाथ गोडसे, फय्याज शेख, भास्कर खटके, दत्ता पाटील, सुनील खराडे, सुनील फाळके, पांडुरंग हराळे, प्रशांत पाटील, सतीश पाटीलआधी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,

















