सोलापूर – डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय) चे 11 वे जिल्हा अधिवेशन कॉ. गोदूताई परुळेकर नगर, मौजे कुंभारी येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात विक्रम कलबुर्गी यांची जिल्हाध्यक्षपदी, ॲड. अनिल वासम यांची जिल्हा सचिवपदी, तर बाळकृष्ण मल्याळ यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अशोक बल्ला यांच्या हस्ते झेंडावंदनाने झाले. त्यानंतर क्रांती चौक ते अधिवेशन स्थळापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. तरुणांनी पांढऱ्या शुभ्र झेंड्यांसह “इंकलाब जिंदाबाद”, “नई सदी की नई लडाई – करो पढ़ाई, लड़ो लड़ाई”, “सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार मिळालेच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला.
अधिवेशनाचे उद्घाटन कामगार नेते कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “आज युवकांच्या नोकरीचे प्रश्न सर्वात गंभीर टप्प्यात आहेत. उच्च शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही, त्यामुळे अनेक तरुण नैराश्यग्रस्त होत आहेत. या परिस्थितीला जबाबदार धोरणांविरोधात युवकांनी संघटित होऊन संघर्ष करावा.”
या अधिवेशनाला सीटू कडून कॉ. किशोर मेहता, जनवादी महिला संघटनेकडून कॉ. नसीमा शेख, एस.एफ.आय. कडून कॉ. मल्लेशम कारमपुरी, किसान सभेकडून कॉ. सुभाष बावकर, तसेच गोदूताई परुळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था व रे-नगर फेडरेशन तर्फे विल्यम ससाणे व नलिनीताई कलबुर्गी यांनी शुभेच्छा दिल्या.
अधिवेशनात विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. सोलापूर महापालिकेतील महापूरप्रसंगी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, हा ठराव किशोर झेंडेकर यांनी मांडला व राहुल बुगले यांनी अनुमोदन दिले.
सोलापूर शहरातील बाग-बगीच्यांचे पुनरुज्जीवन करावे, हा ठराव सुनील (सनी) आमाटी यांनी मांडला व पुष्पा गुरुपनवरू यांनी अनुमोदन दिले. कुंभारी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे पुनर्निर्माण व नवीन रस्ता मंजूर करावा, हा ठराव योगेश आकिम यांनी मांडला व मधुकर चिल्लाळ यांनी अनुमोदन दिले.
कुंभारी गावातील जड वाहतूक रोखावी व बेकायदेशीर टोलनाका बंद करावा, हा ठराव दिनेश बडगु यांनी मांडला व अश्विनी मामाड्याल यांनी अनुमोदन दिले. तसेच संघटनेचे कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. जिल्हा सचिव ॲड. अनिल वासम यांनी संघटनेचा त्रैवार्षिक कामकाजाचा अहवाल मांडला. या अहवालावर प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी नवनिर्वाचित जिल्हा समिती गठित करण्यात आली.
नवनिर्वाचित जिल्हा समिती
जिल्हाध्यक्ष -विक्रम कलबुर्गी
जिल्हासचिव -ॲड. अनिल वासम
जिल्हा कोषाध्यक्ष – बाळकृष्ण मल्याळ
सहसचिव – दत्ता चव्हाण
सहसचिव – अश्विनी मामाड्याल
उपाध्यक्ष – विजय हरसुरे, कादर शेख
सचिव मंडळ सदस्य – बालाजी गुंडे, मधुकर चिल्लाळ, नरेश गुल्लापल्ली, आप्पाशा चांगले
जिल्हा समिती सदस्य – प्रभाकर गेंटयाल, योगेश आकिम, दिनेश बडगु,राहुल बुगले, सुनील आमाटी, बजरंग गायकवाड, पुष्पा गुरुपनवरू, किशोर झेंडेकर, अमित मंचले, अभिजित निकंबे इ.
अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी राज्य कोषाध्यक्ष कॉ. महेंद्र उघडे यांनी मार्गदर्शन केले व येत्या 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनाची माहिती दिली.
राज्य सचिव कॉ. दत्ता चव्हाण यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांनी अध्यक्षीय भाषण करून अधिवेशनाचा समारोप केला.
















