सोलापूर – सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचे माध्यमातून दि. 03 नोव्हेंबर 2025 पासून तीन दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पहिले कीर्तन पुष्प ह भ प सुधाकर इंगळे महाराज सोलापूर यांनी गुंफले आहे. हा मान सोलापूरला मिळाला असून त्यांच्या कीर्तनाने महोत्सवाचे उदघाट्न केले. आशिष शेलार (सांस्कृतिक मंत्री )बयांचे कडून इंगळे महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कीर्तन महोत्सव घेणे गरजेचे आहे. कारण कीर्तन हे जन जागृतीचे मोठे माध्यम आहे. वारकरी संतानी कीर्तन परंपरा महाराष्ट्रतील कानाकोपऱ्यात रुजवली आहे. देशातील युवा शक्ती संघटित करून निर्व्यसनी बनविण्यासाठी कीर्तन आवश्यक आहे. कीर्तनातून संस्कार – विचार दिले जातात. त्यासाठी संतांच्या अभंगाचा पुरावा देऊन प्रबोधन केले जाते. युवाशक्ती देशाचं बल आहे. त्यांना प्रबोधनाची खूपच गरज आहे. म्हणून कीर्तन महोत्सवाचे आयोजन महत्वाचे आहे असे इंगळे महाराज यांनी बोलताना सांगितले.
” सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला | नाही तरी गेला जन्म वाया || ”
हा अभंग घेऊन कीर्तन सेवा करण्यात आली.
या महोत्सवाचे श्री बिभीषण चवरे साहेब (संचालक ) यांनी आयोजन केले व श्रीराम पांडे , संदीप बलखांडे, प्राची गडकरी यांनी परिश्रम घेतले.
या कीर्तनासाठी श्री संत मुक्ताई संस्कृतीक प्रतिष्ठान सोलापूर यांचे महेश चवरे, तुकाराम भोसले व पुरुषोत्तम सुरवसे यांनी गायनाची व गुरुसिद्ध गायकवाड यांनी वादनाची साथ केली आणि दगडू डोंगरे हे विणेकरी होते, उत्तम शिंदे हे चोपदार होते .

















