सोलापूर – खेडेगावातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या श्रीकांत बंडगर यांची पंजाब कुस्ती कोच पदी शासकीय निवड झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग आणि अभिमानास्पद यशाबद्दल गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’ व मित्रमंडळींच्या वतीने त्यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभादरम्यान माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी कुस्तीपटूंच्या व्यथा मांडत खेळाडूंना शासकीय पाठबळ मिळण्याची जोरदार मागणी केली.
इतर खेळांच्या तुलनेत कुस्तीवर अन्याय: सुरेश पाटील
सत्कारप्रसंगी बोलताना माजी नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले “आज शहरात, राज्यात आणि देशात कुस्ती या पारंपरिक मैदानी खेळाला हवे तसे प्रोत्साहन मिळत नाहीये. अलीकडच्या काळात क्रिकेट, कबड्डी किंवा खो-खो यांसारख्या खेळांतील खेळाडूंना सरकारकडून मानधन आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाते. मात्र, कुस्ती हा आपला अस्सल मैदानी खेळ असूनही यातील खेळाडू आणि प्रशिक्षकांकडे शासनाचे हवे तसे लक्ष नाही.
शासकीय नोकरी आणि दरमहा मानधनाची मागणी
सुरेश पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, कुस्तीपटू आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांना शासनाने थेट मदत करणे गरजेचे आहे.
शासकीय नोकरी- खेळाडूंची केवळ निवड करून भागणार नाही, तर त्यांना हक्काची शासकीय नोकरी मिळाली पाहिजे.
दरमहा मानधन- खेळाडू व प्रशिक्षकांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी दरमहा मानधन दिले पाहिजे.
एकत्रित प्रयत्न- कुस्तीपटूंच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सरकारकडून त्यांना पाठबळ मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी गोल तालमीचे संस्थापक अध्यक्ष योगेश सलगर,काशिनाथ स्वामी, विकास चीनकेरी, श्रीकांत कट्टीमनी, राघवेंद्र कडली, सुरज पाटील ,रत्नाकर नरवडे, बाळू माने, नागेश सूळ,ओम धुळे, हिरालाल अटे, अनिरुद्ध कुंदुर, विठ्ठल यमगर, अमोल बंडगर,दिनकर बंडगर, विनायक जाधव उपस्थित होते.
Post Views: 66