माळशिरस – मी सरकारमध्ये नाही .परंतु महसूलमंत्री बावनकुळे यांनी महसूल विभागाचे महत्वपूर्ण लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. त्याची अमंलबजावणी होण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून त्यामुळे सर्वांची सोय होत आहे.मात्र या उपक्रमात सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार उत्तमराव जानकर यांनी काढले .ते
माळशिरस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्व . अजित पवार यांच्या जयंतीनिमित औचित्य साधून महाराजस्व अभियान अक्षता मंगल कार्यालयात आयोजित केला होता त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
यावेळी व्यासपिठावर प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार सुरेश शेजुळ ,नायब तहसिलदार अमोल कदम ,महसूल नायब तहसीलदार सिद्धनाथ जाविर . माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण, .पंचायत समिती सभापती दत्ता मगर, उभसभापती मनिषा पाटील, लाडक्या बहिणी योजनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर ,. जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी सरतापे ,विष्णूपंत नारनवर पं.स सदस्य युवराज झंजे ,बाबासाहेब माने, मारुति लोंढे ,मधुकर पाटील, रिपाइं तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे. ,अमोल पाटील ,नगरसेवक कैलास वामन ., तनुजा खिलारे, नम्रता पुकळे लाभार्थी उपस्थित होते. पुढे बोलताना आ . जानकर म्हणाले की. वृक्षारोपण काळाची गरज ओळखून प्रत्येकांनी झाडे लावावीत . कृषी विभागाने शेतकरी शोधला पाहिजे . रस्त्यांचे कामे झाली पाहिजे . दळवळाबरोबर सुविधा मिळाल्या पाहिजेत असे सांगितले .
प्रांताधिकारी विजया पांगारकर
महसूल दिन म्हणजे कामांचा लेखाजोगा मांडणे व नवीन उदिष्ट ठेवण्यासाठी हा दिवस आहे . हा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे याच्या माध्यमातून दहा हजार दाखले वाटप केले ,अजित पवार कार्यतत्पर होते . या कामांची त्यांना आज आदरांजली ठरू शकेल
Post Views: 12