परभणी / पूर्णा – पूर्णा नगर परिषद आगामी निवडणूक भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पूर्णा येथे आयोजित पत्रकार परिषद बोलताना केले पूर्णा येथे ६ नोव्हेंबर गुरुवार रोजी येथील राम मंदिर येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे अविनाश काळे, आकाश लोहट, दिलीप गिराम, लक्ष्मीकांत कदम, राज ठाकर ,चंद्रकांत टाकळकर , सुनील डुबेवार, सुरेंद्र चिटणीस, डॉ .अजय ठाकूर, संजय अंभोरे ,रोशन एकलारे, बालाजी कदम, निलेश कुरे , सविता गुंडाळे ,साधना बिछडे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी सांगितले नगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकतीने लढणार असून इतर पक्षाच्या युती बाबत बोलणी चालू आहे युती न झाल्यास भारतीय जनता पार्टी स्वभावापासून सर्व प्रभागात आपली उमेदवार उभे करणार आहे.
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भाजपाचाच असेल असे ते म्हणाले प्रत्येक प्रभागात पाच ते सहा जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले येत्या दोन दिवसात युतीचं चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.


















