परभणी / पूर्णा –
बळीराजा साखर कारखान्याचा १२वा गळीत हंगाम मोळीपुजन शुभारंभ दि.०६/११/२०२५ वार गुरुवार रोजी स. ०९:३० वाजता कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय शिवाजीराव जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमास मान्यवर, ऊस उत्पादक शेतकरी, पत्रकार तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.
सन २०२५-२६ गळीत हंगामात कारखान्याने ११ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याकडे ११२५६ हेक्टर सभासदाच्या ऊसाची नोंद आहे. सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर उर्वरित बिगर सभासद यांचा ऊस गाळपासाठी बळीराजा साखर कारखाना आणणार आहे. आमच्या कारखान्याला हंगाम २०२५-२६ मध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे व FRP प्रमाणे दर दिला जाईल, यावर्षी कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० वरून ७५०० मे. टन करण्यात आलेली आहे. तसेच कारखान्याची ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा, कुशल कर्मचारी वर्ग या गळीत हंगामासाठी तत्पर असुन बळीराजा कारखान्यास जास्तीत जास्त शेतक-यांनी आपला ऊस देऊन कारखान्यास सहकार्य करावे. गळीत हंगाम २०२५-२६ यशस्वीरीत्या पार पाडुन ११ लाख मे. टनाचे ऊस गाळप करणेचे लक्ष्य पुर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतुक ठेकेदार तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी सहकार्य करावे. असे आवाहन अजय जाधव यांनी केले.
यावेळी मा. नगरअध्यक्ष उत्तमराव कदम, सुशिल वरपुडकर, मारोतराव बखाल, डॉ. वाघमारे, चांदोजी बोबडे, गोंवद चव्हाण, राजेश दुत, नामदेव जाधव, डॉ. गुलाब इंगोले, व्यंकटराव पारवे, आनंद आजमेरा, दसरथ भोसले, नागनाथ शिंदे, निवृत्ती सोलव, गंगाधर धवन, प्रताप बखाल, बाबुराव बोबडे व मान्यवर उपस्थित होते.
गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिनकर जाधव, जनरल मॅनेजर भगवान मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चिफ केमिस्ट किरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रीक मॅनेजर नितीन गणोरकर, ऊस पुरवठा अधिकारी विनायक क-हाळे, रामजी शिंदे, बालासाहेब तिडके, केन अकौंटट रामेश्वर लंवदे, सुरक्षा अधिकारी विनायक कदम, टाईम किपर गणेश सुर्यवंशी, केनयार्ड सुपरवायजर राजेंद्र मोगरगे महेश हेबळे तसेच कारखान्यातील सर्व विभागातील विभाग प्रमुख, कर्मचारी व शेतकरी, ऊस तोड वाहतुक ठेकेदार उपस्थित होते. सुत्रसंचलन माधव मोहीते यांनी केले आभार जगदीश जोगंदड यांनी मानले.
















