नांदेड / माहूर – व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना, माहूर शाखेच्या तालुका अध्यक्षपदी पत्रकार इलियास बावाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन तालुका अध्यक्ष विजय आमले यांची व्हाइस ऑफ मिडियाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी पदोन्नती झाल्यावर मागील काही दिवसांपासून संघटनेचे माहूर तालुका अध्यक्षद हे रिक्त होते. आता या पदावर बावाणी यांची वर्णी लागली असल्याने “संघटनेच्या विविध कार्याला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु!” असे निश्चयोद्गार बाबाणी यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना काढले.
व्हाइस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,राज्याध्यक्ष अनिल मस्के, जिल्हाध्यक्ष गणेश जोशी, यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले यांनी दि.०७/११/२०२५ रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात व्हाईस ऑफ मीडियाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी पत्रकार इलियास बावाणी यांची एकमताने नियुक्ती केली असल्याचे घोषित केले.
यावेळी व्हाऑमि जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले,
जेष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी, वसंतराव कपाटे यांसह पत्रकार सचिन बेहेरे, गजानन कुलकर्णी, संजय बनसोडे, निखिल कोरडे, सादिक भाई किरमाणी, शेख रफिक भाई तसेच स्नेहांकित निलेश जयस्वाल, वसंतराव राठोड, दत्ता जाधव यांचे सह मान्यवर उपस्थित होते.या नियुक्तीबद्द्ल नेते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व स्नेहांकित मंडळींकडून बावाणी यांचे अभिनंदन केले जात आहे.





















