सोयगाव – महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षांपासून महाविद्यालयासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम (NEP -2020) लागू केला. नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांसाठी नवीन पुस्तके अद्याप उपलब्ध नाहीत.आशा स्थितीत विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमावर पुस्तक उपलब्ध व्हावे.हा हेतू ठेऊन डॉ. मनोजकुमार चोपडे यांनी विद्यार्थ्यांसाठी लॅब सेफ्टी हे कौशल्य अभ्यासक्रमावर आधारित उपयुक्त पुस्तक लिहले.
संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी पदव्युत्तर समन्वयक तथा रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामेश्वर मगर,पदव्युत्तर समन्वयक डॉ.सी.यु.भोरे, आयक्युएसी समन्वयक डॉ.प्रमोद पवार,कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ.उल्हास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.चोपडे यांनी नव्या अभ्यासक्रमावर पुस्तक लिहल्यामुळे उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे,डॉ.सुनील चौधरे,डॉ.संतोष पडघन,डॉ.पंकज गावित,डॉ.शाम टकले,डॉ. विनोद बारोटे,डॉ.श्रीकृष्ण परिहार यांच्यासह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.





















