सोयगाव – येथील कै.बाबुरावजी काळे स्कूलचा प्रथमेश मिसाळ १४ वर्षांखालील ॲथलेटिक्स (१०० मीटर धावणे) राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर,जालना,बीड,हिंगोली विभागीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा (वयोगट १४,१७ व १९ वर्षाखालील मुले/मुली) दि.८ शनिवार रोजी पार पडल्या. क्
रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या मान्यतेने के.के.एम. महाविद्यालय मानवत जिल्हा.
परभणी येथे विभागस्तर ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात कै.बाबुरावजी काळे स्कूलच्या प्रथमेश विजय मिसाळ याने १०० मीटर रनिंग मध्ये कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूलच्या प्रथमेश मिसाळ याने चौदा वर्ष गटात दुसरा क्रमांक पटकावला असून त्या यशस्वी विद्यार्थ्यांचे परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी साकरे मॅडम,शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई काळे,सचिव देवीनाताई काळे-भटकर,संचालक शिवदीप काळे,सुनयना काळे,मुख्याध्यापक निलेश पाटील,ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश यादव,प्रा.कमलेश काळे, उपमुख्याध्यापक प्रा.ज्ञानेश्वर एलिस,पर्यवेक्षक सागर घाटे, क्रीडाप्रेमी महेश मानकर,शाळेतील सर्व शिक्षक आणि पालकांनी अभिनंदन केले आहे. हा विद्यार्थी आता राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहेत.
सोबत फोटो –





















