सोलापूर – जिल्ह्याचे ४५ वर्षावरील प्रौढ गटाचे क्रिकेट संघ निवडण्यासाठी रेल्वे मैदानावर ९ व १० नोव्हेंबर रोजी निवड चाचणी आयोजित केली आहे.
शहर व जिल्ह्यातील इच्छुकांनी ९ व १० नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते आठ या वेळेत अजय माळी अथवा अतुल परदेशी यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन सोलापूर डिस्ट्रीक्ट व्हेटरन्स स्पोर्टस असोसिएशन ऑफ ऑल स्पोर्टसचे सचिव जयंत दळवी यांनी कळविले आहे.
















