अक्कलकोट – तालुक्यातील श्रीक्षेत्र गौडगांव बु येथील जागृत दक्षिणमुखी मारुती देवस्थान येथे महाराष्ट्र कर्नाटकसह देशभरातून लाखो भाविक भक्त मोठ्या संख्याने दर्शनासाठी गर्दी करतात. भाविक भक्ताचा वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने मुस्लिम समाजाचे निसार शेख या मारुती भक्ताने स्वतःच्या शेतात मोफत वाहन पार्किंगची सोय करून दिले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील श्रीक्षेत्र गौडगांव बु येथील रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या जागृत मारुती देवास्थानाला भक्तांचा लोंढा दिवसदिवस वाढतच आहे. निसार शेख यांच्या मालकीच्या एक एकर शेत जमिनीमध्ये पेरणी न करता दुचाकी, व चार चाकी वाहनांसाठी मोफत पार्किंगची सोय केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.या ठिकाणी वाढत्या गर्दीमुळे भाविकांना पार्किंगची गैरसोय जाणवत होती. ती गैरसोय भाविकांना होऊ नये म्हणून मोफत विनामूल्य पार्किंगची सोय केली आहे.
स्वामी समर्थाच्या पुण्यपावन अक्कलकोट तालुक्यातील श्रीक्षेत्र गौडगांव हे दक्षिणमुखी मारुतीचे जागृत व मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र गौडगांव है स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट पासून ११ कि.मी. आणि अक्कलकोट रेल्वे स्टेशनपासून २ कि.मी. अंतरावर आहे. या मारुतीची उपासना केल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. ११ शनिवार किंवा ११ मंगळवार येथे न चुकता येऊन श्रद्धेने व्रत पूर्ण केल्याने भक्तांचे मनोकामना पूर्ण होत असल्याने येथे देश भरातून लाखो भाविक भक्त नेहमी मोठया श्रद्धा भक्तीने येतात.
या मारुती मंदिरावर निसार शेख यांनी स्वखचनि १५ लाख खर्च करून हेलिकॉप्टरने मंदिरावर पृष्पवृष्टी करून जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना लाजवेल असे कार्य केले आहे. स्वत: मुस्लिम समाजात जन्माला आल्याने पुष्पवृष्टी करण्यास स्वतः हेलिकॉप्टरमध्ये न बसता मंदिर समितीचे पुजारी व स्वामी यांच्या शुभ हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आले. अशा अनेक विधायक कार्य निसार शेख यांनी केले आहे.
गौडगांव बु’ येथील दक्षिणमुखी जागृत हनुमान देवस्थान माझा कुटुंबाच श्रद्धास्थान आहे. लहानपणी याच मंदिरात जिल्हा परिषद शाळा भरत होता. मी या शाळेत शिकलो आहे.गावातच लहानाचा मोठा झालो असून जागृत हनुमानामुळे माझे सर्व काही उद्योग धंदे व्यवस्थित चालू आहे. यामुळे १५ लाख रु. खर्च करून हेलिकॉप्टरने या मंदिरावर पुष्पवृष्टी केली आहे.याशिवाय थोड्याचं दिवसात स्वताची अर्धा एकर शेत जमीन जागेत अन्नछत्रासाठी जागा उपलब्ध करून स्वताच बांधकाम करून देणार आहे.
– निसार शेख निःसीम हनुमान भक्त तथा उद्योगपती

















