सोलापूर – समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांच्यानंतर सोलापूरच्या समाजकल्याण विभागाला पूर्ण वेळ अधिकारीच मिळाला नाही. दलित वस्ती सुधारणा योजना,शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीयांचे वस्तीगृह शाळा, वैयक्तिक लाभाच्या योजना, मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह अशा अनेक योजना समाजकल्याण विभागाकडून राबविल्या जातात. या योजनांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी शासनाकडून येतो. परंतु पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाकडून नसल्याने प्रभारी अधिकार्यांना काम करणे मुश्किल बनले आहे. जिल्ह्यातील वसतीगृहांसह इतर अनेक योजनांबद्दल तक्रारी असताना प्रभारी अधिकार्यांना वेळ मिळत नसल्याने लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. शिवाय चौकशी व कारवाई करताना प्रभारी अधिकार्यांवर बंधने येतात. कार्यालयात कर्मचारी संख्याही अपुरे आहे. यामुळे कर्मचार्यांमध्येही योजनांची अंमलबजावणी व लाभ देण्यासाठी हलगर्जीपणा वाढत आहे . त्यामुळे जिल्ह्यातून आलेल्या लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लाभार्थ्यांनी आपल्या व्यथा कुणाला सांगावे ? अशी अवस्था निर्माण झाली आहे.
त्यामुळे समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी करण्यात येत आहे.
…
…..
अतिरिक्त पदभार प्रसाद मिरकले यांच्याकडे
…
सुलोचना सोनवणे यांनी
समाजकल्याण विभागाचा पदभार सोडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. प्रभारी अधिकाऱ्यांवर हा विभाग किती दिवस चालविणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे .
…
पूर्णवेळ अधिकार्यांची गरज
….
समाजकल्याण विभागाकडून शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविले जातात. शिवाय मुलींच्या वसतीगृहासारखे शैक्षणिक विषयही आहेत. यासाठी समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकार्याची गरज आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे प्रभारी अधिकार्यावर कामकाज करावे लागत आहे. शासनाच्या योजना प्रत्यक्ष अमलबजावणीसाठी पूर्णवेळ समाजकल्याण नेमणूक करावे.
नितीन रणखांबे, तालुका अध्यक्ष, भाजपा,
अनूसूचित जाती मोर्चा, दक्षिण सोलापूर
















