सांगोला – चार वर्षांपूर्वी झालेल्या मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे खचून गेलेल्या वामन महादेव घाडगे (वय-६२) व अनिता वामन घाडगे (वय-५५) या आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोला तालुक्यातील हतीद येथे सोमवार दि.१० नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
याबाबत विकास वामन घाडगे रा.हतीद, ता.सांगोला यांनी सांगोला पोलिस ठाण्यात मी माझे मोटारसायकल घेवून हतीद गावात ग्रामपंचायत मध्ये कामानिमित्त गेलो होतो. त्याचवेळी माझी पत्नी स्वाती ही माझे चुलते विलास घाडगे यांचे घरी गेली होती. माझे आई-वडील घरीच शेतामधील काम करीत होते. दुपारी दीडच्या दरम्यान माझे हतीद गावामधील काम संपवुन घरी आलो. त्यावेळी स्वयंपाकाची पत्राची खोलीचे दोन्ही दार आतील बाजुने बंद होते. त्यामुळे मी पत्राचे सिमेंटच्या खिडकीतुन आतमध्ये पाहीले असता लोखंडी अँगलला माझे वडील व आई यांनी गळफास घेतल्याचे दिसत होते. त्यामुळे मी लगेच आराडा ओरड करून खोलीचा पाठीमागील दरवाजा जोराने ढकलून उघडला होता. त्यावेळी माझे आई-वडीलांनी वेगवेगळे साडीला खोलीचे मध्यभागी असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेतला होता.

माझे आईवडील हे माझा भाऊ आकाश याचा अपघातामध्ये मृत्यू झाले नंतर त्याचे मरणानंतर खचले होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडी आणि रागीट स्वरूपाचा झाला होता. त्यामुळे त्यांचे मध्ये कोणत्या तरी कारणांवरून चिडचिड झाल्याने त्या रागाचे भरात आज रोजी दुपारी दीडच्या पुर्वी माझे आई-वडीलांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली आहे अशी खबर दिली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.


















