उमरी / नांदेड – उमरी तालुक्यातील मोजे बोळसा ( बु.) येथील अविवाहित शेतकऱ्याने सतत नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून स्वतःच्या शेतात नायलॉनच्या दोरीने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिं. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती उमरी पोलीसांनी दिली.
मागील महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले यातच संसाराचा गाडा कसा हाकलावा या विवंचनेतून मोजे बोळसा (बु.) येथील अविवाहित शेतकरी सोपान मारोती डिडेवार वय २६ वर्षे रा बोळसा बुद्रुक ता उमरी जि नांदेड येथील शेतकऱ्यांने सततची नापिकी व बॅकेच्या कर्जाला कंटाळून स्वताच्या शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉन दोरीने गळा फास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे.याप्रकरणी उमरी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उमरी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मयत शेतकरी मारोती डिडेवार यांच्या पश्चात आई ,वडील,भाऊ बहीन असा परिवार आहे. या प्रकरणी मयताचे वडील मारोती डिडेवार यांच्या फिर्यादीवरुन उमरी पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. एल. सुर्यवंशी हे पुढील तपास करीत आहेत.


















