Friday, April 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी कामे करतांनी सावधानता बाळगावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

तरुण भारतbyतरुण भारत
November 12, 2025
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जालना : जिल्ह्यात सध्या सर्वत्र ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापूरी मंडळात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जायमोक्यावर जाऊन स्थळ पाहणी केल्यानंतर लक्षात आले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी शेतातील कामे करतांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळात मंगळवार दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मौजे पिठोरी सिरसगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट वन्य प्राणी दिसला असल्याच्या माहितीवरुन वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जायमोक्यावर जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान बिबटचा या परिसरात वावर असल्याचे दिसून आले. हा वन्य प्राणी या भागात साधारण 10 किलोमिटरच्या परिघात वावरत असून सदर क्षेत्रात प्रामुख्याने ऊसाचे पीक दिसून आले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम चालु असल्याने बिबट प्राणी शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सुखापुरी मंडळात सुखापुरी, वडीकाळ्या, एकनाथ नगर, वडीगोद्री, पिठोरी सिरसगाव, कारंजळा या गावांचा समावेश आहे. तरी या गावातील ग्रामस्थ, शेतकरी व ऊसतोड करणाऱ्या मजुरांमध्ये वन्यजीव बचाव टीमकडून वन्य प्राणी बिबटबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

ऊसतोडणी किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समुहाने कामे करावीत. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. बिबट आढळुन आल्याने ऊसतोडणी सुरु असताना शेतकऱ्यांनी व मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. गावाजवळ, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळविण्याचा किंवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यात बिबट किंवा त्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ संबंधित वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी विजय दौंड  (मो.8262078886), वनपरिमंडळ अधिकारी बी.एम.पाटील (मो.9730414287) आणि वनरक्षक कैलास कदम (मो.9730131498) यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. असेही आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

·        वन विभागाकडून जनजागृती

उंदीर, पक्षी, सरपटणारे प्राणी, डुकरे आणि कुत्रे हे बिबट्याचे खाद्य आहे. प्रत्येक बिबट्याला पोकळ ठिपक्यांची विशिष्ट रचना असते.  त्यामुळे  गावाजवळीत शेतात बिबट आल्यास त्याला बघण्यासाठी गर्दी करु नये, दगड मारुन त्याला पळविण्याचा प्रयत्न करु नये, पहाटे व सायंकाळी अंधारात गावाबाहेर व शेतात जाण्याचे काही काळ टाळावे, बिबट दिसताच जवळच्या वनरक्षक व चौकीदाराला कॉलकरुन माहिती द्यावी. पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अचानक बिबट जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. बिबट्याला त्यांच्या मार्गाने जावू द्या, त्याला डिवचण्याचा प्रयत्न कदापी करु नका आणि तात्काळ वन विभागाला  1926 या क्रमांकावर संपर्क साधावा. याप्रमाणे अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळामधील गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये वन विभागाचे सहायक वनसंरक्षक सुदाम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी विजय दौंड, वनपरिमंडळ अधिकारी बी.एम.पाटील, वनरक्षक  कैलास कदम, श्री.शिंगणे, श्री.मिटके, श्रीमती जाधव, श्रीमती फड  यांचा समावेश आहे.

Post Views: 92
Previous Post

ग्रामदैवत माहुरची आई देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धा

Next Post

ओंकार साखर कारखान्याच्या प्रथम 25005 साखर पोत्याचे पुजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ओंकार साखर कारखान्याच्या प्रथम 25005 साखर पोत्याचे पुजन

ताज्या बातम्या

आता सोलापूर मध्ये डॉ. चिन्मय परळे यांची रुग्णसेवा सुरू

April 16, 2026

डॉ. तनुश्री परळे यांचे सोलापुरातील रुग्णसेवेत पदार्पण

April 16, 2026

उदगीर मध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

April 16, 2026

अंतर्मनातील बालस्व ओळखा आत्मशुद्धीतूनच खरे सुख

April 16, 2026

मुख्याध्यापक सुनील वानखेडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात साजरा

April 16, 2026

पार्क चौकात सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला

April 16, 2026

रेणुका महागावकर लिखित हृदयस्थ पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

April 16, 2026

भोकरदन येथे स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

April 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0813471

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697