पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील माजी सभापती संग्राम चे जहागिरदार पार्टीचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे कार्यकर्ते किशोर ब्रम्हदेव लोखंडे यांची माळशिरस तालुका सामाजिक न्याय विभागाच्या कार्याध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक धनंजय साठे यांनी निवड करून निवडीचे पत्र आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी प्राध्यापक धनंजय साठे, महेश वाघमारे, उपस्थित होते.त्यांच्या या निवडीचे माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार, माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर ,संचालक नानासाहेब मदने ,समशेर सिंग राजपूत ,मोहसीन शेख, राजेंद्र कराडे ,सचिन मदने, जुबेर पठाण तानाजी लोखंडे ,माजी सरपंच आप्पासाहेब लोखंडे ,सागर लोखंडे कुमार लोखंडे , प्रदीप मदने यांनी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माळशिरस तालुका सामाजिक न्याय विभागाच्या कार्याध्यपदी निवडीचे किशोर लोखंडे यांना पत्र देताना आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाध्यक्ष प्राध्यापक धनंजय साठे, वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रजनीश बनसोडे, महेश वाघमारे .


















