बार्शी – आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या अनुषंगाने विचारविनिमय बैठक संपन्न झाली. भाषणाच्या सुरुवातीलाच आमदार सोपल यांनी उपस्थितांच्या नावाच्या उल्लेखाप्रसंगी विश्वास बारबोले यांचे नाव घेत, नगराध्यक्षा पदासाठी ग्रीन सिग्नलचा संकेत दिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
यावेळी बोलताना आमदार दिलीप सोपल म्हणाले की, “्वि्व्वि््वि्व्वि्वि्व्वि््वि्व्वि विध्वंसक प्रवृत्तीच्या विरोधात सगळ्यांना मिळून हा लढा उभा करायचा आहे. भाजपमध्ये मुस्कटदाबी झालेल्या अनेकांनी वर्क फ्रॉम होम करणारी काही मंडळी आहे, ते विधानसभेला त्यांनी दाखवून दिलं आहे. मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, आपल्याला सगळ्यांना मिळून ही निवडणुकीची लढाई जिंकायची आहे. ही निवडणूक आपल्याला अतिशय जिद्धीने, ताकदीने आणि मनोभावे लढवणे गरजेचे आहे. विधानसभा जिंकली पण ती अर्धी लढाई जिंकली, आता नगरपरिषद निवडणूक जिंकून पूर्ण लढाई जिंकायची आहे.
जोपर्यंत नगरपरिषद आपण जिंकणार नाही तोपर्यंत लोकशाही नांदणार नाही. काहीही करुन विजय खेचून आणायचा आणि त्यासाठी बार्शीकर जनता पाठीमागे ठामपणे उभा राहील, असा विश्वास आमदर सोपल यांनी यावेळी व्यक्त केला. समाविचारी मित्रांना सोबत घेऊन या निवडणुकीला समोर जायचं आहे, जनतेने मनात आणलं तर ४२ नगरसेवक निवडून आणून राज्यात रेकॉर्ड करु शकता. जात पर ना पात पर दिलीप सोपल कि बात पर” अशा प्रकारचा नारा देत आमदार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















